अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी संस्थान विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनासंदर्भात सुरू असलेल्या वादप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती रोहित डब्ल्यू. जोशी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (दि.३०) सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी दि. २८ मे २०२५ रोजी दिलेल्या आदेशास स्थगिती दिली आहे.