Breaking

गंगामाउली साखर करण्यावर प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजा रोहन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवली नाही

Updated: फेब्रुवारी 26, 2026

By Vivek Sindhu

कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांचे उपोषण

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कारवाई करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांचे उपोषण

केज :- प्रजासत्ताक दिनाच्या ध्केवजारोहन प्रसंगी केज येथील गंगा माउली साखर कारखान्याच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने या कारखान्यावर आणि त्यांच्या.संचालक मंडळावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड यांचे मागील चार दिवसा पासून केज येथील तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणार्थीची प्रकृती खालावली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २३ फेब्रुवारी पासून स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड हे केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी निवेदनाद्वारे अशी मागणी केली आहे की, केज तालुक्यातील गंगामाऊली साखर कारखाना उमरी येथे दि. २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनी भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वबंध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जाणीवपूर्वक डावलून ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडण्यात आला. ही घटना केवळ अवमानकारक नसून भारतीय संविधान, लोकशाही मूल्ये व दलित समाजाच्या अस्मितेवर थेट आघात करणारी आहे.

ध्वजारोहण करणारे आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी हेतुपुरस्कारणे आणि त्यांच्या गंभीर निष्काळजीपणाने बाबासाहेषांच्या प्रतिमेचा अवमान करून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रॉसिटी कलमा अंतर्गत गंभीर गुन्हा असून संबंधित सर्वावर  तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. साखर कारखान्यावर तात्काळ प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करून तो बंद करण्यात यावा. अशी त्यांची मागणी असून त्यांच्या उपोषणाला दोन दिवस झाले आहेत. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषणाला पाठिंबा दिला असून त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. 

दरम्यान.उपोषणाचा चौथा दिवस असल्याने उपोषणार्थी यांची प्रकृती खालावली आहे.


Categories

Recent Posts