Breaking

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास

Updated: फेब्रुवारी 26, 2026

By Vivek Sindhu

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आष्टी – तालुक्यातील केरूळ येथील एका महिलेच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे मिनी गंठण अज्ञात दोन चोरट्यांनी भरदिवसा लंपास केल्याची घटना बुधवार (दि.२५)रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास शेरी पुलावर घडली असून या झटापटीत महिला स्कुटीवरून पडल्याने नातीसह जखमी झाली आहे.

   बीड-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे असून आष्टी तालुक्यातील केरूळ येथील एक महिला आपल्या नातीला कडा येथील दवाखान्यात दाखवण्यासाठी स्कुटीवरून आली होती. उपचार घेऊन त्या गावाकडे परतत असताना, शेरी पुलावर मागून भरधाव वेगात आलेल्या दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १६ ग्रॅमचे मिनी गंठण भरदिवसा लंपास केल्याची घटना बुधवार (दि.२५)रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.चोरट्यांच्या या ओढाताढीत महिलेचे स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि त्या नातीसह खाली पडल्या. यात त्यांना दुखापत झाली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.ह.भाऊसाहेब आहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Categories

Recent Posts