Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाई बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत डल्ला; महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

Updated: फेब्रुवारी 17, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीत डल्ला; महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: शहरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत भरदिवसा चोऱ्या होण्याचे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अंबाजोगाई बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील २९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने शिताफीने लंपास केले आहेत. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तळणी येथील रहिवासी गंगाबाई राजु गित्ते या त्यांच्या पतीसह दाढदुखीच्या उपचारासाठी अंबाजोगाई येथील एका खाजगी रुग्णालयात आल्या होत्या. डॉक्टरांना दाखवून गावाकडे परतण्यासाठी त्या दुपारी दोन वाजेच्या सुमारास अंबाजोगाई बसस्थानकावर पोहोचल्या. दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास स्थानकावर अंबाजोगाई-अहमदपूर ही बस आली असता त्या बसमध्ये चढू लागल्या. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात व्यक्तीने बसमध्ये चढत असताना गंगाबाई यांच्या गळ्यातील २ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि ७ ग्रॅमचे सोन्याचे मणी असा एकूण २९ हजार १६ रुपयांचा ऐवज गळ्यातून तोडून चोरून नेला.

काही वेळाने प्रवासात गळ्याला हात लावला असता दागिने चोरीला गेल्याचे गंगाबाई यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पतीला ही माहिती दिली आणि गाव गाठून त्यानंतर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून अंबाजोगाई शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार बदाम अर्शुल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts