Breaking
वडवणी – अंगणात खेळत असलेला बालक घराच्या पाठीमागील पाण्याच्या खड्ड्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी पुसरा येथे घडली. आदित्य अमोल झोडगे (३) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.
वडवणी तालुक्यातील पुसरा येथील अमोल प्रल्हाद झोडगे हे ऊसतोड कामगार असून ऊसतोडणी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत. त्यांना एक मुलगा, एक मुलगी अशा अपत्य आहेत.
त्यापैकी आदित्य अमोल झोडगे मुलगा हा खेळण्यासाठी घराबाहेर पडला. खेळता खेळता तो घराच्या पाठीमागे गेला, त्या ठिकाणी एका मोठ्या खड्ड्यामध्ये असलेल्या पाण्यात तो पडला. त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
कुटुंबीयांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याला पाण्याच्या बाहेर काढत तत्काळ कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी अडीच वर्षीय आदित्य झोडगे यास मृत घोषित केले. वडवणी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा करत बालकाचे कुप्पा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.
Last Updated: June 25, 2025
Share This Post