Breaking
Updated: डिसेंबर 15, 2025
संस्थेच्या प्रगतीचे केले कौतुक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelसंस्थेच्या प्रगतीचे केले कौतुक
अंबाजोगाई: अंबाजोगाई शहरातील ज्येष्ठ समाजसेवक आणि ‘दैनिक विवेक सिंधू’चे संस्थापक संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी नुकतीच शहरातील प्रतिष्ठित अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेस सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पतसंस्थेच्या कामकाजाची पाहणी केली आणि संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
या भेटीप्रसंगी अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उमर फारूक सर यांनी प्रा. गाठाळ यांचे स्वागत केले. त्यांनी पतसंस्थेचा चढता आलेख, ग्राहकांसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध ठेवी व कर्ज योजना, संस्थेची भक्कम आर्थिक स्थिती आणि सामाजिक बांधिलकीतून सुरू असलेले उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली. सहकार क्षेत्रात पारदर्शक कारभार आणि ग्राहकांचा विश्वास जपल्यास संस्था कशी प्रगती करू शकते, याचे उत्तम उदाहरण अलखैर पतसंस्थेने निर्माण केले असल्याचे मत यावेळी प्रा. गाठाळ यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी अलखैर नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रा. नानासाहेब गाठाळ यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या सदिच्छा भेटीवेळी पतसंस्थेचे व्यवस्थापक, सर्व कर्मचारी वृंद तसेच शहरातील इतर मान्यवर उपस्थित होते.