Breaking

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे,सोशल माध्यमातून प्रचार

Updated: नोव्हेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध फंडे,सोशल माध्यमातून प्रचार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई(प्रतिनिधी) – अंबाजोगाईसह राज्यातील सर्व नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची घोषणा होताच शहरासह ग्रामीण भागात राजकीय वातावरण तापू लागले आहे. अनेक उत्सुक व अतिआत्मविश्वास उमेदवारांनी आपली राजकीय उपस्थिती दाखवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. काही ठिकाणी ‘भावी नगरसेवक, भावी नगराध्यक्ष’, ‘भावी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य’ असे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या आहेत.
या सोशल मीडियावरील स्पर्धेमुळे सर्वसामान्य मतदारांमध्येही चर्चांना उधाण आले आहे. काहीजण या गोष्टींकडे उमेदवारांचा आत्मविश्वास म्हणून पाहत आहेत, तर काहीजण याला दिखाव्यांची स्पर्धा मानत आहेत.
निवडणुकीतील उमेदवार अजून जाहीर न होता नगरपरिषदेच्या बऱ्याच प्रभागातील काही उमेदवार ‘भावी नगरसेवक /नगरसेविका’ किंवा ‘भावी नगराध्यक्ष आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सदस्य सदस्या अशी घोषणा करत आहेत. यावरून त्यांच्या उत्सुकतेचा आणि राजकीय आकांक्षेचा अंदाज येतो. मात्र, या बॅनरबाजीने मतदार यात कोणाला कौल देतात, हा खरा प्रश्न आहे.नगरपरिषद निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेकजण सोशल मीडियावर सक्रिय झाले आहेत. फेसबुक, व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम यांसारख्या माध्यमांतून प्रचाराचे
सोशल मीडियावर चर्चा
सत्र जोरात सुरू आहे. जनतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी मैदानात उतरत आहे. स्टेटस, व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून उमेदवार स्वतःला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र, शेवटी मतदार विकास, पारदर्शकता पाहनच निर्णय घेतात. हे लक्षात घेण्याची गरज आहे.
प्रभाग शहरातील सर्व क्रमांकमधील इच्छुक उमेदवारांची भावी नगरसेवक व सेवक पोस्ट मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. अंबाजोगाई नगरपरिषदेमधील सर्व प्रभागात दररोज घडामोडीही वाढल्या आहेत. प्रत्येक समाजात कमीतकमी दोन आणि जास्तीत जास्त पाच ते सात जण इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. उमेदवाराची ‘लॉटरी’ कोणाला मिळणार आहे, याकडे संपूर्ण शहरवासियांचे लक्ष लागले आहे.


Categories

Recent Posts