Breaking
Updated: नोव्हेंबर 17, 2025
दररोज विविध प्रभागातील अनेक नवतरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelविविध प्रभागातील अनेक तरुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसा अंबाजोगाई शहरातील नवतारुणांचा ओढा राजकिशोर मोदी यांच्याकडे येऊ लागला आहे. शहरातील विविध प्रभागातील अनेक नवतारुणांचा राष्ट्रवादी काँग्रेस तथा राजकिशोर मोदी यांच्याकडे जाहीर प्रवेश होऊ लागला आहे. या नवतारुण युवा मतदारांच्या मुळे युवा नेते संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी यांचा आत्मविश्वास द्विगुणीत होतांना दिसून येत आहे. सर्व नवतरुणाईने एकवटून अंबाजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच त्याच्या सर्व नगरसेवकाना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आणण्यासाठीचा विडा त्यांनी उचलला आहे.
अंबाजोगाई शहरात युवा नेतृत्व संकेत राजकिशोर मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून त्याची साथ देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक १, प्रभाग क्रम २ , प्रभाग क्रमांक ३ , ४, ९,१०, ११ ,१२, १४,१५ या प्रभागातील पटाईत गल्ली, बागवान गल्ली , झारे गल्ली, चौभारा परिसर, मंगळवार पेठ, बलुत्याचा मळा, गौड गल्ली, धनगर गल्ली, साबून गल्ली, मणियार गल्ली, सदर बाजार,भोई गल्ली, गवळी पुरा, गांधी नगर, बिलाल नगर, क्रांती नगर या व अशा अनेक भागातील असंख्य नवतरुण बिनशर्त संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी यांच्याकडे वळल्या जात आहे. या नवतारुणांचा जोश व उत्साह पाहून मोदी कुटुंब हत्तीचे बळ लाभल्याची अनुनभूती घेत आहे. त्यांच्यात शहराच्या विकासाची जनभावना पुन्हा जोमाने उफाळून येऊ लागली आहे.
राजकिशोर मोदी यांनी मागील तीस पस्तीस वर्षांपासून अंबाजोगाई शहरासाठी केलेल्या सामाजिक , राजकीय , आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रेरित होऊन आजचा तरुण वर्ग त्यांच्या संपूर्ण पणे पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करत आहेत. त्यांनी शहरात विविध शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित केले आहेत. त्याचबरोबर बॅंक , पतसंस्था, मल्टिस्टेट यांच्या माध्यमातून देखील शेकडो तरुण बेरोजगारांना आर्थिक साहाय्य करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना उभा केले आहे. बाल- झुंबडच्या माध्यमातून शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना एक हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेच राजकिशोर मोदी हे नाव अंबाजोगाई शहरातील लहानापासून ते वयोवृद्ध नागरिकांच्या मना मनामध्ये घर करून आहे. याचा थेट फायदा हा संकेत मोदी व राजकिशोर मोदी यांना व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हमखास पणे होईल अशी खात्री मोदी परिवारास दिसून येत आहे.