Breaking
Updated: June 14, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupधनंजय मुंडे यांचे विनाअनुदानित शाळा कृती समितीला आश्वासन
बीड- महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीची रास्त मागणी सभागृहात मांडून येत्या पावसाळी अधिवेशनात टप्पा वाढीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निधीची तरतूद होई पर्यंत पाठपुरावा करून आपला प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ आणि जेष्ठ समाज-सेवक डॉ. संजय तांदळे यांना दिले.
माजीमंत्री धनंजय मुंडे हे काल दि. १३ जून रोजी बीड शहरात आले. असता बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी त्यांची भेट घेऊन विना अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले. या मध्ये प्रामुख्याने राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेध्याशानुसार वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या आवश्यक निधीची तरतूद करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांच्या व्यथावेदना याची मला जाणीव आहे. कित्येक दिवसापासून नव्हे तर वर्षापासून बिना पगारी काम करताना काय वेदना असतात. त्यांच्या घरची परिस्थिती कशी असते, याची मला चांगली जाणीव आहे.
त्यामुळे आपल्या सर्व मागण्या रास्त असून या रास्त मागण्या विधिमंडळात मांडून येत्या पावसाळी अधिवेशनात टप्पा वाढीसाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्याशी चर्चा करून निधीची तरतूद व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
जोपर्यंत टप्पा वाढीसाठी आवश्यक निधीची तरतूद होत नाही. तोपर्यंत पाठपुरावा सुरू ठेऊन तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आश्वासन माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ आणि जेष्ठ समाज-सेवक डॉ. संजय तांदळे यांना दिले.
त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात वाढीव टप्प्याच्या निधीची तरतूद होऊन खूप दिवसांपासून टप्पा वाढीचा अस-लेला हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्याने विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यात चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.