Breaking
Updated: May 27, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupगेवराई – तालुक्यातील मारफळा येथील शेतकरी अभिमान लक्ष्मण कबले व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर अभिमान कबले या बाप लेकाचा विद्युत मोटारचा करंट लागल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (दि.२७) मंगळवार रोजी सकाळी सात वाजता घडली.
गेवराई तालुक्यातील मारफळा येथील शेतकरी अभिमान लक्ष्मण कबले हे आपल्या गावा जवळील शेतात मोटर चालू करण्यासाठी नेहमी प्रमाणे गेले होते. मोटरमध्ये करंट उतरल्याने अभिमान लक्ष्मण कबले, (वय ५०) हे चिटकले, त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर अभिमान कबले (वय २२) हा गेला.
परंतु त्याला विजेचा धक्का बसल्याने दोघा बाप-लेकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (दि.२७) मंगळवार रोजी सकाळी सात वाजता घडली. बाप-लेकाचे शवविच्छेदन बीड जिल्हा रुग्णानयात करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने मारफळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.