Breaking
Updated: June 27, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupबीड : बीड शहरातील उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये असलेल्या क्लासेसचे संचालक व शिक्षक अशा दोघांवर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.२६) सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. प्राध्यापक विजय पवार व प्रशांत खटावकर अशी त्यांची नावे आहेत.
पिढीत विद्यार्थिनी ३० जुलै २०२४ पासून या क्लासेसमध्ये शिक्षण घेते. क्लासेस संपल्यानंतर प्रशांत खटावकर व विजय पवार हे या विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलावत तिचा विनयभंग करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जवळपास वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकुमार लांडगे हे करत आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी पथक रवाना केले असल्याची माहिती लांडगे यांनी दिली. दरम्यान बीडच्या शैक्षणिक वर्तुळात मात्र या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.