Breaking
Updated: July 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupबीड : जिल्ह्यातील वाळू माफियांविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाईची धार अधिक तीव्र केली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळण्यासाठी MPDA कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येत आहे.
मुंगी, ता. शेवगाव, जि. अहील्यानगर येथील सुरज विठ्ठल ढाकणे (वय २७) यास चकलांबा पोलिसांनी तडीपारी करत छत्रपती संभाजीनगर येथील हर्सूल कारागृहात रवाना केले आहे. सुरज ढाकणे याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जाळपोळ, वाळू चोरी, सरकारी कामात अडथळा, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला, मारहाण, धमकी, अवैध शस्त्र बाळगणे असे एकूण ९ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदर इसमावर यापूर्वीही प्रतिबंधक कारवाई झाली होती, मात्र त्याने गुन्हेगारी सुरूच ठेवली. त्याचा परिसरात दहशत निर्माण झाली होती. सहायक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी त्याच्याविरुद्ध MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी बीड यांनी १९ सप्टेंबर २०२४ रोजी आदेश दिला होता.
सुरज ढाकणे फरार होता. अखेर गुप्त माहितीच्या आधारे १८ जुलै २०२५ रोजी त्यास मुंगी फाट्यावर ताब्यात घेण्यात आले. १९ जुलै रोजी त्याला हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी भविष्यातही वाळू माफिया, खंडणीबहाद्दर व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर MPDA अंतर्गत कठोर कारवाई सुरूच राहील, असे सांगितले.