Breaking

वाघोरा येथे शेतातील घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरी

Updated: ऑगस्ट 12, 2025

By Vivek Sindhu

वाघोरा येथे शेतातील घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव : तालुक्यातील वाघोरा गावाजवळील शेतातील घरात मध्यरात्री तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) पहाटे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद नारायण बादाडे (वय ६५, व्यवसाय शेती, रा. वाघोरा, ता. माजलगाव) यांच्या शेतातील घराचा दरवाज्याची कडी उघडून आरोपी आत शिरले. घरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने, पिशवीत ठेवलेली ५,००० रुपये रोख रक्कम व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण ६२,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सफौ ९२१ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


Categories

Recent Posts