Breaking

वाघेबाभूळगाव शिवारात दाम्पत्याचा विहिरीत बुडून मृत्यू

Updated: डिसेंबर 8, 2025

By Vivek Sindhu

वाघेबाभूळगाव शिवारात दाम्पत्याचा विहिरीत बुडून मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडलेल्या पत्नीला वाचविताना पत्नीसह पतीचा मृत्यू झाल्याची घटना वाघेबाभूळगाव (ता. केज) शिवारात घडली.
पवारवाडी (ता. केज) येथील मयत शेतकरी भास्कर विनायक पवार यांच्यासह त्यांची पत्नी अल्का पवार व मुलगा ऋषिकेश हे तिघे ५ डिसेंबर रोजी वाघेबाभूळगाव शिवारातील शेतात खुरपणी करीत होते. दुपारी ४. १५ वाजेच्या सुमारास अल्का पवार या पिण्यासाठी पाणी विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्या. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचे पती भास्कर पवार यांनी विहिरीत उडी मारून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्का पवार व भास्कर पवार या दोघा पती – पत्नीचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुग्रीव शंकर पवार यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे हे करीत आहेत.


Categories

Recent Posts