Breaking
Updated: June 6, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupचकलांबा – शिरूर कासार तालुक्यातील घोगसपारगाव मंडलेश्वर वस्ती येथे हायवाच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच (दि.४) बुधवार रोजी कारवाई करत २५,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बीड जिल्हयात मागील काही दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी कारवाईचा सपाटा सुरु केला असून. शिरूर कासार तालुक्यातील घोगसपारगाव मंडलेश्वर वस्ती येथे हायवाच्या साहाय्याने अवैध वाळ्ची वाहतूक करताना अज्ञात हायवा चालकावर चकलांबा पोलिसांनी (दि.४) बुधवार रोजी कारवाई केली.
यात पिवळ्या रंगाचा भारत बेंझ हायवे क्रमांक एमएच २३ एयु २६२४ अंदाजे किंमत २५,००,००० व त्यामध्ये पाच ब्रास वाळू प्रति ब्रास ६००० रुपये प्रमाणे ३०००० रुपये असा एकण २५,३०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असून पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत.