Breaking
Updated: नोव्हेंबर 21, 2025
ऊस दरवाढीसाठी 24 नोव्हेंबरपासून बेमुदत चक्काजाम
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelऊस दरवाढीसाठी 24 नोव्हेंबरपासून बेमुदत चक्काजाम
बीड – ऊसदर प्रश्नी जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना एक होत आक्रमक पवित्रा घेत आहेत. जिल्ह्यातील माजलगाव या ठिकाणी दि 24 नोव्हेंबर रोजी ऊस दरासाठी होणाऱ्या अभूतपूर्व चक्काजाम आंदोलनात सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे व ऊसतोडी बंद ठेवून ऊसतोड व वाहतूक बांधवांनी सहकार्य करण्याचे व सभाव्य नुकसान टाळण्याचे आवाहन ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आले आहे. दि 23 रोजी शेतकऱ्यांनी आपापल्या गावात टायर जाळून आपण सहभागी असल्याचा व यंत्रणांनी दखल घेण्याचा सुचक इशारा द्यावा.
दि 19 नोव्हेंबर रोजी माजलगाव येथील बाजार समितीत जिल्हाभरातील सर्व शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक झाली या बैठकीत या आंदोलनातील विविध टप्प्यांचा आढावा मांडून ऊस कारखान्यांच्या असंवेदशील वागण्याचा आढावा मांडण्यात आला. गळाप हंगाम 2025 – 26 साठी बीड जिल्ह्यातील कोणत्याही कारखान्याने केंद्र शासनाच्या घोषित एफआरपीप्रमाणे ऊसदर किती देणार ? याबाबत कोणतेही भाष्य किंवा प्रसिद्धी पत्रक जाहीर केलेले नाही. यामुळे ऊसाचे दर आणि त्या दरांची घोषणा याबाबत जिल्हाभरात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाला तो रस्त्यावर उतरला आहे. या अनुषंगाने ऊस उत्पादक शेतकरी प्रतिनिधी नी जिल्हाभरातील जवळपास सर्वच ऊस कारखान्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना एफ.आर.पी. प्रमाणे एक रक्कमी भाव मिळावा. तसेच या गाळप हंगामासाठी किती दर देणार? हे विचारण्यासाठी शिष्टमंडळ भेटले. मात्र यातून अपेक्षित गोष्टी घडून आल्या नाहीत. म्हणून हा प्रश्न आणखी चिगळला आहे. या अनुषंगाने दि. 24 नोव्हेंबर 2025 रोजी माजलगाव येथील वसंतराव नाईक चौक परभणी नाका या ठिकाणी जोपर्यंत प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. ऊस कारखानदाराशी चर्चाकरून प्रश्न मार्गी लावण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला होता; मात्र त्याला कारखानदारांनी प्रतिसाद न देऊन ती संधी गमावली. आता चर्चा चौकात होईल त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात दीर्घकाळ संघर्ष करण्याच्या तयारीने यावे व सर्व ऊस कारखानदार व साखर सहसंचालक संभाजीनगर यांना चर्चेसाठी येथेच येणे भाग पडावे आता चर्चा टेबलावर नाही ऊस दराची चर्चा होणार भर चौकात हा पवित्र घेतला आहे.
रिकव्हरीची चोरी रोखून किमान खऱ्या FRP प्रमाणे तरी एक रकमी उचल मिळायलाच हवी. मात्र साखर उतारा हाच अंतिम ऊसदराचा निकष न राहाता ए रिव्हन्यू शेरिंग फॉर्मुल्यानुसार साखर उताऱ्यासाठी 70:30 व इतर उपपदार्थावर 75:25 हा शेतकरी व कारखानदारांचा वाटा लक्षात घेऊन उसाला किमान चार हजार रुपये अंतिम ऊस दर मिळालाच हवा!
-कॉ. अजित नवले, शेतकरी नेते
शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एड. ढगे, युवा शेतकरी संघर्ष समितीचे अजय राऊत, कॉ अजय बुरांडे, जगदीश फडताळे शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकतीने मैदानात उतरणार