Home »
Patoda » संत एकनाथ महाराजांसह आणखी दोन पालख्यांचे गारमाथ्यावर होणार स्वागत
संत एकनाथ महाराजांसह आणखी दोन पालख्यांचे गारमाथ्यावर होणार स्वागत
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकाऱ्यांनी घेतला आढावा
पाटोदा – आषाढी एकादशीच्या निमित्त विठ्ठल भेटीसाठी दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पैठण येथून निघालेली संत एकनाथ महाराज यांची पालखी बुधवार (२५ जून) रोजी पाटोदा तालुक्यात मुक्कामी दाखल होणार आहे. टाळ मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत अत्यंत शिस्तीत पंढरपूरच्या दिशेने निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखीत हजारोचा वारकरी जनसमुदाय सहभागी झालेला असून त्यांच्या स्वागताची तयारी पाटोदा शहरापासून दहा ते बारा किलामीटर अंतरावरील गारमाथा येथे करण्यात आली आहे. त्या दृष्टीने नगर पालिका, पंचायत समिती, पोलिस प्रशासन, महसुल प्रशासनास कार्यतत्पर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात उपिवभागीय अधिकारी वसीमा शेख, तहसीलदार दत्तात्रय निलावाड, मुख्याधिकारी अभयकुमार जोशी, नगराध्यक्षप्रतिनिधी राजूभैय्या जाधव यांनी मंगळवार (१७ जून) रोजी आढावा घेतला आहे.
प्रशासनाकडून पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. वारकऱ्यांच्या चहा-पाणी व नाष्ट्याची सोय केली जाणार आहे. त्याच प्रमाणे इतरही मुलभूत सुविधांची पुर्तता प्रशासनाकडून केली जाणार आहे. पाटोदा तालुक्यातील भाविक भक्तांची दर्शनासाठी होणार असलेल्या संभाव्य गर्दीचा विचार करता प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील नियोजन पुर्ण करण्यात आले आहे. प्रशासनाकडून उपविभागीय अधिकारी वसीमा शेख, मुख्याधिकारी अभयकुमार जोशी हे गारमाथ्यावर संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पाटोदा तालुक्यात स्वागत करणार आहेत. दरम्यान पालखी पाटोदा शहराकडे येत असताना त्या पालखी सोहळ्यात सहभागी होत अधिकारी पायी चालणार आहेत. एकंदरीत संत एकनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागताची तयारी प्रशासनाने केलेली असून पथदिवे दुरुस्ती, पाणी पुरवठ्याचे नियोजन, रस्त्यावरी खड्डे बुजवण्याचे काम केले जात आहे. या आढावा बैठकी दरम्यान पाटोदा शहरात पैठण-पंढरपूर महामार्गावरील रस्ताच्या पुलाच्या संदर्भात तिव्र नाराजी व्यक्त करीत तहसीलदार दत्तात्र निलावाडा यानी महामार्ग विभागाचे अधिकारी व कंत्राटदार यांना धारेवर धरले. त्यांनी पुलाचे व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्याच्या सुचना महामार्ग अधिकारी व कंत्राटदार दिल्या.
प्रशासनाकडून गैरसोय टाळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न यंदा गारमाथ्यावर तीन पालख्यांचे स्वागत केले जाणार आहे. दरम्यान वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असून सर्व संबंधित विभाग अधिकारी व यंत्रणांना या संदर्भात योग्य त्या सूचना देण्यात आले आहेत. त्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावरून तयारी केली जात आहे. -दत्तात्रेय निलावाड, तहसीलदार पाटोदा