पिण्याच्या पाण्याबरोबर जल सिंचनाचा प्रशन मिटला
धारूर . प्रतिनिधी दि 30 वडवणी तालुक्यातील उपळी कुंडलिका मध्यंम प्रकल्प आज दिनांक 30 रोजी ओव्हरफुल होऊन ओसंडून वाहू लागला आहे या मुळे या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व शेतीच्या पाण्याचा प्रश्न दोन वर्ष कायमस्वरूपी मिटला आहे या तलावावर या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन जलजीव न च्या पाईपलाईन मुख्यमंत्री पेज यांच्या पाईप लाईन तसेच शेतीला पाणी व लोकनेते सुंदर राव सोळुंके सहकारी साखर कारखाना तेलगाव यासाठीही याच तलावावरून साखर कारखान्याला पाण्याचा पुरवठा केला जातो अशा परिस्थिती हा तलाव 100 % भरने खूप महत्वा चे आहे या वर्षी मे महिन्यातच पाऊस भरपूर झाल्यामुळे पुंडलिका तलाव मे महिन्यामध्ये 70 टक्के पूर्ण क्षमतेने भरलेला होता राहिलेला 30% कुंडलिकामध्ये प्रकल्प दिनांक 30 /7 /2025 रोजी पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे या मुळे या परिसरातील ऊस बागायतदार शेतकरी सुखावला आहे या पाण्यामुळे शेतीमध्ये शेतकरी पांढरे सोनं पिकवू लागलेला आहे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच जलसिंचनाचा हि प्रश्नही 100% मिटलेला आहे सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी हा तलाव शंभर टक्के शेतकऱ्यांना लाभदायी वरदान ठरत आहे या परिसरात जवळजवळ पिण्याच्या पाण्यासाठी दहा ते वीस गावे जोडली गेली आहेत याच तलावावरून धारूरला पाणी पिण्यासाठी नवीन पाईपलाईन मंजूर झालेली आहे आणि ते कामही सध्या प्रगतीपथावर दिसत असून धारूरकरांना पण याच तलावावरून पिण्याची पाणी भविष्यात मिळणार आहे धारूर तालुक्यासह वडवणी तालुक्यात या तलावामुळे शेतकऱ्यांची नविन हरितक्रांती घडवून आणली आहे याच तलावावर पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांसह शेतीला पाणी शेतकऱ्यांना पाणी दिले जाते असे कालवा निरीक्षक कोळेकर पि एस यांनी सांगितले .