Breaking
Updated: डिसेंबर 10, 2025
उप जिल्हाधिकारी दीपक वजाळे यांचे विद्यार्थ्यांना 'सत्याच्या शोधा'चे आवाहन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelउपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांचे विद्यार्थ्यांना ‘सत्याच्या शोधा’चे आवाहन
अंबाजोगाई: योगेश्वरी नूतन विद्यालय, अंबाजोगाई येथील वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले. या समारंभास उपजिल्हाधिकारी ,अंबाजोगाई दीपक वजाळे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडियाच्या युगात ‘सत्याचा शोध घेण्या’चे महत्त्वपूर्ण आवाहन केले, तसेच वाचनाचे महत्व विशद केले. योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर हे संमेलन अध्यक्ष होते.व्यासपीठावर संस्थेचे संचालक रमण सोनवळकर, संचालक , लंकेश वैद्य,सय्यद पाशु सर, मुख्याध्यापक सौ. ए आर पाठक, उपमुख्याध्यापक व्ही.के.गायकवाड, पर्यवेक्षक आर एस मठपती , व्ही एम.राऊत , पर्यवेक्षक एस.बी.शिंदे , पालक – शिक्षक संघाचे प्रतिनिधी , शिक्षक प्रतिनिधी , विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, “आजचे युग हे सोशल मीडियाचे आहे, जिथे माहितीचा महापूर आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक विद्यार्थ्याने सत्याचा शोध घेण्याची वृत्ती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ सोशल मीडियावर उपलब्ध माहितीवर अवलंबून न राहता, तुम्ही चिकित्सक व्हा आणि वाचन करून योग्य माहिती मिळवा.”
वजाळे यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचे महत्व पटवून देताना, चांगले नागरिक बनण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबतच नैतिक मूल्यांची कास धरणे गरजेचे असल्याचे सांगितले.
संमेलन अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थी संमेलन हा शिक्षणाचाच अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले.
ते म्हणाले: “विद्यार्थी संमेलन शिक्षणाचाच भाग आहे. शिका, समृद्ध व्हा. विद्यार्थ्यांसाठी संस्था सदैव तत्पर आहे. आपले व्यक्तिमत्त्व घडवा आणि आयुष्यात यशस्वी व्हा.”
संस्थेच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला विकसित करण्याचे आणि उज्ज्वल भविष्य घडवण्याचे आवाहन केले.
यावेळी ॲड. अजित लोमटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संमेलनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले. संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या संमेलनाला उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले. यामध्ये देशभक्तीपर गीते, लघुनाटिका आणि मनोरंजक स्किट्सचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. त्यांनी वर्षभरातील विद्यालयाच्या प्रगतीचा आणि विद्यार्थ्यांच्या यशोगाथेचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षकवृंदांनी केले, तर उपस्थितांचे आभार मानून स्नेहसंमेलनाची सांगता झाली.