Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीडमध्ये उत्तर प्रदेशच्या मजुरांना मारहाण करत करून घेतलं काम

Updated: फेब्रुवारी 13, 2026

By Vivek Sindhu

बीडमध्ये उत्तर प्रदेशच्या मजुरांना मारहाण करत करून घेतलं काम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

यूपी-बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या तत्परतेने झाली सुटका

बीड: जिल्ह्यातील धारूर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या ११ ऊसतोड मजुरांना मजुरी न देता, त्यांना डांबून ठेवून त्यांचा छळ करण्यात आला. बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशाने महसूल आणि पोलीस प्रशासनाने बुधवारी सायंकाळी धाडसी कारवाई करत या मजुरांची ‘वेठबिगारी’तून मुक्तता केली आहे.

धारूर तालुक्यातील आमला येथील ओम चंद्रकांत सोळंके याने नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील ललितपूर आणि मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ११ मजुरांना ऊसतोडणीसाठी आणले होते. मात्र, कामाचा मोबदला मागितला असता सोळंकेने त्यांना अमानुष मारहाण केली. त्यांना घराबाहेर पडू न देता, जिवे मारण्याची धमकी देऊन सतत राबवून घेतले. मजुरांच्या ठेकेदाराने पैसे मागितले असता त्यालाही बदडून काढण्यात आले.


Categories

Recent Posts