Breaking
Updated: फेब्रुवारी 23, 2026
अंबाजोगाई तालुक्यात अवकाळी पाऊस; पीके भुईसपाट
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)- अंबाजोगाई तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांचे े नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या पावसासह काही ठिकाणी वादळी वार्यामुळे उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक ठिकाणी पिके भुईसपाट झाली आहेत.
तालुक्यातील हरभरा, गहू, बाजरी तसेच अंब्याच्या झाडांना, भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. काढणीच्या तयारीत असलेली पिके पावसामुळे ओलसर होऊन शेतातच आडवी झाली आहेत. काही शेतांमध्ये वार्यामुळे पिक आडवे झाले असून त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेतीमालाला म्हणावा तसा भाव नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यातच नव्या अडचणी उभ्या राहत आहेत. सोयाबीनेचे काही ठिकाणी मळणी सुरू आहे तर गहू, हरभरा हे पिके आता काढणीला सुरू आहेत. त्यामुळे अचानक झालेल्या पावसामुळे शेतकर्यांची चांगली तारांबळ उडाली आहे.