Breaking
Updated: मार्च 11, 2026
लुटले, नेकनूर पोलिसांत गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिलांना लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मांजरसुंबा आणि धोत्रा शिवारात तीन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून येत दोन महिलांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले. या प्रकरणी १० मार्च २०२६ रोजी छबाबाई अरुण रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीवरून नेकनूर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पहिली घटना ६ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मांजरसुंबा शिवारातील यशोदीप जिनिंग गेटसमोर घडली, जिथे छबाबाई रसाळ यांना धमकावून त्यांचे ३०,००० रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि कानातील दागिने लुटले गेले.
त्यानंतर तासाभरातच, दुपारी १ वाजेच्या सुमारास धोत्रा शिवारात मंगल प्रल्हाद सोनवणे या महिलेलाही अशाच प्रकारे लुटण्यात आले. चोरट्यांनी दोन्ही महिलांचे तोंड दाबून त्यांना ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या दोन्ही घटनांमध्ये एकूण ५४,६५० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. पीडित महिलांनी दिलेल्या वर्णनानुसार, काळसर रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या या तिन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक पद्माकर आहेर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.