Breaking
Updated: मार्च 12, 2026
केज तालुक्यातून दोन मुलींचे अपहरण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन मुलींचे अपहरण करण्यात आले असून त्यापैकी एक मुलगी १४ वर्षाची अल्पवयीन आहे तर दुसरी १९ वर्ष वयाची आहे.
दि. ११ मार्च रोजी मध्यरात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास तुकुचीवाडी ता. केज येथील एक १४ वर्षाची आठवीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी ही रात्री तिच्या आई शेजारी घरात झोपलेली होती. रात्री तिचे वडील शेतातील पिकांची राखण करून घरी परत आले असता त्यांना मुलगी घरी आढळून आली नाही. त्यांनी तिचा गावात व नातेवाईकाकडे शोध घेतला असता ती आढळून आली नाही. तिचा रंग गोरा, उंची अंदाजे साडेचार फुट, अंगात लाल रंगाचा पंजाबी ड्रेस व काळी पॅन्ट, गुलाबी रंगाची ओढणी आणि पायात स्लीपर चप्पल, केस काळे व लांब असे वर्णन आहे. अल्पवयीन मुलीचे अज्ञातांनी अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
अन्य दुसऱ्या घटनेत दि. २८ फेब्रुवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास बोबडेवाडी ता. केज येथे गावातील एक १९ वर्ष वयाची १२ वी ची परीक्षा दिलेली तरुणी ही शेतमजुराचे मजुरीचे पैसे देण्यासाठी गावात गेली असलेली तरुणी घरी परत आली नाही. तिच्या आई वडिलांनी सर्वत्र शोध घेतला परंतु ती सापडली नाही. तिच्या वडिलांनी केज पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
तिचा रंग सावळा, उंची अंदाजे साडेचार फुट, अंगात निळ्या रंगाचा टॉप व पांढरी पँन्ट, पायात सँडल, केस काळे व लांब असे तिचे वर्णन आहे.
या दोन्ही अपहरणाच्या घटनेचा तपास प्रभारी पोलिस अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे करीत आहेत.