Breaking
Updated: मार्च 10, 2026
केज जवळ दोन कारचा अपघात : पाचजण जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- केज जवळ केज मांजरसुंबा महामार्गावर उमरी पाटी जवळ दोन कारच्या अपघातात पाचजण जखमी झाले असून पोलिसांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे आहे.
दि. १० मार्च रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास रिलायन्स पवन ऊर्जा कंपनीत सुरक्षा रक्षकांचे सुपरवायजर म्हणून काम करीत असलेले माजी सैनिक मधुकर बालासाहेब गायकवाड, (रा. चिंचोली माळी ता. केज) आणि त्यांचे सहकारी सिद्धेश्वर देवसन आदमाने, वय (रा. बीड) हे दोघे त्यांच्या स्विफ्ट डिझायर क्र. (एम एच-४४/एस-७४३२ ) असून कारने बीडच्या दिशेने जात असताना त्यांना बीड कडून केजच्या दिशेने येत असलेल्या टाटा अल्टोरोस कार क्र. (एम एच-२३/बी एच-६५६६) या दोन कारची
केज-मांजरसुंबा महामार्ग क्र. ५४८- डी वर गंगामाउली साखर कारखान्या जवळ असलेल्या कदमवाडी फाट्या जवळ असलेल्या चंद्रकांत खरात यांच्या आदित्य बिअर बार अँड परमिट रुम जवळ या दोन कारची समोर समोर धडक झाली. या अपघातात टाटा अल्ट्रॉस मधील शिवराज रविंद्र माने, रवि संतराम शिंदे आणि आत्माराम मोरे हे तिघे तर स्विफ्ट डिझायर मधील मधुकर बालासाहेब गायकवाड,
मधुकर बालासाहेब गायकवाड आणि सिद्धेश्वर देवसन आदमाने हे दोघे जखमी झाले आहेत.
या अपघातात दोन्ही कार मधील एकूण पाचजण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, जमादार गित्ते, संतोष गित्ते, शिवाजी कागदे, तांबारे, रामहरी शिंदे, नितीन मेटे आणि गृहरक्षक दलाचे जवान हे तत्काळ अपघात स्थळी हजर झाले. ॲम्ब्युलन्स पायलट सुमित तेलंग यांच्या ॲम्ब्युलन्स मधून अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले आहे.
अपघातातील जखमी
१) शिवराज रविंद्र माने, वय (३३ वर्ष) (रा. बीड), २) रवि संतराम शिंदे, वय (३३ वर्ष) (रा. बीड), ३) अनिल आत्माराम मोरे, वय (३२ वर्ष) (रा. बीड), ४) सिद्धेश्वर देवसन आदमाने, वय (२० वर्ष) (रा. बीड) आणि ५) मधुकर बालासाहेब गायकवाड, वय (५४ वर्ष), (रा. चिंचोली माळी ता. केज)