Breaking
Updated: एप्रिल 13, 2026
चिंचोली माळीत शॉटसर्किटने आग लागून आगीत कुत्रा, वासरू मरण पावले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे विजेचे शॉटसर्किट होऊन गोठा व जवळच असलेल्या राहत्या घराला आग लागली. या आगीत कुत्रा व म्हशीचे लहान वासरू भाजून जागीच मरण पावले. तर दोन म्हशीसह वगार भाजली असून शेती अवजारे जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
चिंचोलीमाळी ता. केज येथील शेतकरी महेंद्र अविनाश घोडके यांचे गावा लगत शेत असून ते शेतात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरा जवळून विद्युत पुरवठा करणारी लाईन गेली आहे. सोमवारी दि. १३ रोजी दुपारी ३:०० वा.च्या सुमारास विजेच्या तारांचे शॉटसर्किट होऊन जनावरांच्या गोठ्याला आग लागली. महेंद्र घोडके हे घरी नव्हते. महिलांनी आग पहिली, त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. मात्र तो पर्यंत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग सर्वत्र पसरली. तो पर्यंत गोठ्यातील कुत्रा व म्हशीचे लहान वासरू भाजून जागीच मरण पावले. तर त्या शेजारी असलेल्या दोन म्हशी व मोठी वगार ही भाजली. मात्र ते दावे तोडून बाहेर पळाल्याने बचावल्या. या जनावरे भाजून गंभीर जखमी झाले आहे. तर गोठ्यातील शेती अवजारे जळाले असून ही आग राहत्या घरात ही पसरली. अग्नीशामक दलाने व शेजारच्या लोकांनी धावाधाव करीत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तब्बल तीन तासा नंतर आग आटोक्यात आली. तो पर्यंत घरातील कपडे, अन्नधान्य आणि संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाले होते. आगीने घोडके यांचा संसार उघड्यावर आला असून त्यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करीत प्राथमिक माहिती घेतली आहे. तर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भेट देऊन भाजलेल्या दोन म्हशी व वगारावर उपचार केले. या आगीची प्रशासनाने दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी महेंद्र घोडके यांनी केली आहे.