Breaking

तार चोरताना टॉवर कोसळला; पुण्याच्या टोळीतील दोघांचा नांदूरघाट शिवारात मृत्यू

Updated: मार्च 30, 2026

By Vivek Sindhu

InShot 20260330 080921045 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

रस्ते अपघाताचा बनाव, दोन्ही मृतदेह परभणीत नेल्यानंतर घटना उघडकीस

केज (गौतम बचुटे) : केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरात पुण्याहून टॉवरच्या तार चोरी करण्यासाठी आलेल्या संशयीत टोळीतील दोघांचा दोघांचा लोखंडी टॉवर तुटून मृत्यू झाला. दोघांचा जागीच मृत्यू झाल्यास त्या दोघांचे प्रेत एका इर्टिगा कार मध्ये घेऊन ते परभणी ते येथे गेले. परभणी येथे गेल्या नंतर मृतदेहा सोबत आलेल्या साथीदार पळून गेल्याने ईर्टिगा चालकाने दोन्ही मृतदेह ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केल्या नंतर घटना उघडकीस आली.

दि. २९ मार्च रोजी रात्री १२:३० वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील चाकण येथील मेदनकरवाडी येथील अविनाश पटोळे वय १७ वर्ष, आकाश श्रीराम आडे आणि त्यांचे साथीदार हे सुरज श्रीराम गिराम याच्या इर्टिगा कार मधून केज तालुक्यातील नांदुरघाट परिसरातील डोंगऱ्याचीवाडी शिवारातील टोरँटो पवन चक्की मध्ये निर्माण झालेल्या विद्युत उर्जेचे वहन करण्यासाठी उभारलेल्या टॉवरची तार चोरण्यासाठी आले होते. त्यांनी टॉवरवर चढून तार काढीत असताना टॉवरचे एका बाजूचे संतुलन ढासळल्याने टॉवर एका बाजूला ओढला जाऊन लोखंडी टॉवर तुटून खाली पडला आणि त्यामध्येअविनाश पटोळे वय १७ वर्ष, आकाश श्रीराम आडे यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्या नंतर त्यांच्या साथीदारांनी त्या दोघांचा मृत्यू हा अपघातात झाल्याचे भासवून त्यांना सुरज राजू गिराम याच्या इर्टिगा कार मधून मतांच्या मूळ गावी परभणी येथे घेऊन गेले. परभणी येथे गेल्या नंतर मृतदेहा सोबत असलेले त्यांचे साथीदार दोन्ही प्रेत गाडीत ठेवून पळून गेले. त्या नंतर इर्टिगा चालक सुरज गिराम याने एका ॲम्ब्युलन्स मधून दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पर्यंत याची कुणकुण मयतांच्या नातेवाईकांना लागताच त्यांनी गोंधळ घातला. ही माहिती परभणी येथील पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेला लागताच त्यांनी इर्टिगा चालक सुरज गिराम याला ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्याला केज पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही.

केज पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या आदेशाने सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी तिथे रक्त आणि त्यांच्या पायातील पादत्राणे व इतर साहित्यासह व पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

कार चालक सुरज गिराम याने दिलेली माहिती
इर्टिगा कारमधून नांदुर घाट येथून मयत अविनाश पटोळे आणि आकाश श्रीराम आडे यांचे मृतदेह परभणी येथे नेण्यात आले त्या कार चालक सुरज गिराम याच्या कडून अशी माहिती समजते की, त्याच्या गाडीतून फिरायला जायचे म्हणून चाकण, पुणे येथून दोघे मयत आणि त्यांच्या सोबत आकाश पेठे, दीपक भगत आणि वैभव आदत हे सर्वजण आले होते. येथे आल्या नंतर चोरी करताना टॉवर वरून पडून अविनाश पटोळे आणि आकाश श्रीराम आडे यांचा मृत्यू झाल्या नंतर त्यांचा रस्त्यावर अपघात झाल्याचे खोटे सांगून त्यांना परभणी येथे घेऊन गेले असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाची भेट
घटनास्थळी बीड येथील फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन रक्त मिश्रित माती आणि पुरावे याचे नमुने ताब्यात घेतले आहेत.

परभणी पोलिस पथकाची भेट
या गंभीर घटनेची माहिती परभणी पोलिसांना झाल्या नंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बेद्रे यांनी केजला येऊन सुरज गिराम याची चौकशी केली.


Categories

Recent Posts