Breaking

झोका खेळताना चिमुकलीचा गळफास लागून अंत

Updated: मार्च 31, 2026

By Vivek Sindhu

झोका खेळताना चिमुकलीचा गळफास लागून अंत

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजलगाव – एका निष्पाप मुलीच्या खेळण्या-बागडण्याच्या वयात गळफास लागून अंत झाला. ही मन हेलावून टाकणारी घटना मंगळवारी शहरात घडली.मृत मुलीचे नाव वृंदा समीर रुद्रवार (वय 9) असे आहे. चिमुरडी इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत होती.

 माजलगावचे व्यापारी प्रदीप रुद्रवारचे खंडोबा मैदान परिसरात निवासस्थान आहे. 31 मार्च 2026 रोजी महावीर जयंतीनिमित्त शाळेला सुट्टी होती, नऊ वर्षांची वृंदा आपल्या धाकट्या बहिणीसोबत घराच्या वरच्या मजल्यावर खेळत होती. झोका खेळण्यासाठी ती झोक्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याचदरम्यान तिने एका खुर्चीचा आधार घेतला. अशातच अचानकपणे खुर्ची निसटली आणि दुर्दैवाने झोक्याचा दोर वृंदाच्या गळ्याला आवळला गेला. बराच वेळ झालं वृंदा जेवणासाठी खाली आली नाही, हेच बघण्यासाठी आई वरच्या मजल्यावर गेली. वृंदाच्या गळ्याला फास बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली, तसेच आईनं किंकाळी फोडली. तिच्या आर्त किंकाळ्या ऐकून वृंदाचे आजोबा, वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांना तात्काळपणे वरच्या मजल्यावर धावले. नंतर वृंदाला रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Categories

Recent Posts