Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

धमक्यांना कंटाळून तरुणाची गॅरेजमध्ये आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये तिघांच्या नावाचा उल्लेख

Updated: फेब्रुवारी 19, 2026

By Vivek Sindhu

सुसाईड नोटमध्ये तिघांच्या नावाचा उल्लेख

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

धारूर: येथील केज रोडवर असलेल्या मोरया ऑटोमोबाईल गॅरेजमध्ये एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित तरुणाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यामध्ये तिघांच्या धमक्यांना कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणी धारूर पोलिसांनी तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

दिनेश आसाराम सावंत असे मयत तरुणाचे नाव असून तो रेपेवाडी येथील रहिवासी होता. या प्रकरणी त्याचा भाऊ मुंजाराम आसाराम सावंत (वय २४) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दिनेश आणि मुंजाराम हे धारूरमध्ये भाड्याने घेतलेले गॅरेज चालवत असत. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी जेव्हा मुंजाराम गॅरेजवर गेला, तेव्हा शटर आतून बंद असल्याचे आढळले. शटर तोडून आत प्रवेश केला असता दिनेशने पिवळ्या नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी दिनेशच्या खिशात एक चिठ्ठी सापडली, ज्यात संतोष रेपे, सर्जेराव रेपे (दोन्ही रा. रेपेवाडी) आणि अशोक लोमटे यांच्याकडून मिळणाऱ्या धमक्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले होते. यापूर्वी दिनेशवर एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामुळे तो तणावात होता, त्यातच या धमक्यांमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पोलीस उप-निरीक्षक अनिल पांडे करत आहेत.


Categories

Recent Posts