Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

‘ना खाउंगा, ना खाने दुंगा’: अंबाजोगाई पालिकेत भ्रष्टाचाराला थारा नाही; तक्रारीसाठी नगराध्यक्ष मुंदडांनी जाहीर केला वैयक्तिक मोबाईल क्रमांक

Updated: जानेवारी 5, 2026

By Vivek Sindhu

Picsart 26 01 05 22 03 58 644 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: नगर परिषदेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांची पैशांसाठी अडवणूक होऊ नये आणि पारदर्शक कारभार व्हावा, यासाठी नूतन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नगर परिषद कार्यालयात कोणत्याही कार्यालयीन कामासाठी पैशांची मागणी केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी गैरप्रकार आढळल्यास थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

नगर परिषद प्रशासनात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने नगराध्यक्षांनी एका विशेष सूचनेद्वारे नागरिकांना आश्वस्त केले आहे. अनेकदा शासकीय कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी चकरा माराव्या लागतात किंवा काही वेळा पैशांची मागणी केली जाते, अशा तक्रारी समोर येतात. हे टाळण्यासाठी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी ही कडक भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, कार्यालयातील कोणत्याही कामासाठी कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्यास किंवा कामात अडवणूक केल्यास नागरिकांनी न डगमगता त्यांच्याशी थेट संपर्क साधावा.

या मोहिमेमुळे भ्रष्टाचाराला आळा बसण्यास मदत होईल आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नगराध्यक्षांनी आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक ९४२२२४०५२३ सार्वजनिक केला असून, तक्रारदारांनी थेट संवाद साधण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाचे शहरवासीयांकडून स्वागत होत असून, यामुळे प्रशासकीय कामात अधिक शिस्त आणि पारदर्शकता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


Categories

Recent Posts