Breaking

सालगड्याचा मुलाची पोलीस दलात निवड

Updated: एप्रिल 7, 2026

By Vivek Sindhu

गावकऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गावकऱ्यांनी साजरा केला आनंदोत्सव

अंबाजोगाई (पुढारी वृत्त सेवा):- अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या फारुख शेख यांचा मुलगा मगदूम फारुख शेख याची महाराष्ट् पोलीस दलात निवड झाली आहे. अत्यंत गरिबी तथा बिकट परिस्थितीवर मात करून मगदूमने मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण सुगावकरांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत मगदुम फारुख शेख यांची महाराष्ट्र पोलिस दलात (पुणे शहर) निवड झाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत त्यांनी अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. मगदुमचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या साधारण परिस्थितीची असून वडील सालगडी आणि आई देखील दुसर्याच्याच शेतात मोलमजुरी करून मुलाला आर्थिक पाठबळ दिले आहे. मुलानेही आपल्या पालकाचे कष्ट वाया न घालविता व परिस्थितीची जाण ठेवत ध्येयाची पूर्ती केली आहे.
मगदुम याने शिक्षणासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करत त्यांनी पोलिस भरतीसाठी कठोर मेहनत घेतली. अनेक अडचणी, आर्थिक संकटे आणि कठीण परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या ध्येयापासून विचलित न होता सतत प्रयत्न सुरू ठेवले अखेर त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आणि त्यांची महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाली. त्यांच्या या यशामुळे कुटुंबियांसह सुगाव गावातील नागरिकांनी अभिमान व्यक्त करत आनंदोस्तव साजरा केला जात आहे. मागदुमच्या या यशाबद्दल त्याचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे.


Categories

Recent Posts