Breaking
Updated: फेब्रुवारी 19, 2026
शिवजंयती ठरली आनंदाची पर्वणी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्व व शौर्यावर आधारीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम बीडकरांसाठी हास्याची, आनंदाची, मनाची उकल करण्याची संधी ठरली असून टाळयांचा कडकडाट व हास्याने नाटयगृह दणाणले. कार्यक्रमाचे नियोजन उत्तमरितीने केल्याने सर्वाना शिवजयंतीचा आनंद उपभोगता आला हे ख-या अर्थाने कार्यक्रमाचे यश म्हणावे लागेल.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निखिल फाऊडेंश मुंबई यांनी शाहिरी लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी शैलेस सुर्यंवशी, जिल्हा क्रिडा अधिकारी आरविंद विद्यागर, तहसीलदार चंद्रकांत शेळके, शिक्षणाधिकारी रंगणाथ राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, अविनाश पाटील, रेवनाथ शेलार, कालिदास होसूरकर, अनिकेत काळे संबधित अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्व व शौर्यावर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रमात प्रिया पवार यांनी
एकच राजा इथे जन्मला शिवनेरीच्या किल्लयावर, हे गाणे सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले
छेडू नकोरे मथूरेच्या लाला… , जाऊ दे मथूरेच्या बाजारला… या गवळणीवर नाटयगृहातील शालेय विद्यार्थ्यानी ठेका धरुन नाटयगृहात टाळयाचा कडकडाट मिळवला.
शैलेस निसर्गधं यांनी आईभवाणी तुझ्या भक्ताला हे गोधंळी गीत गाऊन प्रेक्षकांनाही ताल धरण्यास भाग पाडले.
जरीच्या चोळीला सोन्याचे लावते बटन, नटन माझ नटन समूहाने हे गीत सादर केले.
रोहीत जाधव यांनी विजयाची आली वार्ता, तोफेचा आवाज कडाडला या गीताने रसिक श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे करुन उपस्थितांची दाद मिळवली.
प्रस्ताविक करतांना सुत्रसंलकाने विविध प्राण्याच्या आवाजाची, दादा कोंडके, निळु फुले, इंदोरीकर यांचे आवाजाची नक्कल करुन सर्वाना खिळवून ठेवले.
. गर्जा महाराष्ट्र माझा या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. यावेळी सामान्य प्रशासनाचे उपजिल्हाधिकारी यांनी निखिल फाऊंडेशन मुंबईच्या वतीने सादर करण्यात आलेल्या सर्व कलाकारांचे आभार मानले आणि कार्यक्रम पाहिजे त्यापेक्षाही कैक पटीने यशस्वी झाल्याचे मनोगत व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा व विचारांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला.
दिप प्रज्ज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन सांस्कृतीक कार्यक्रमास सुरुवात झाली.