Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मांजरसुंबा घाटात पिकअपवर दगडफेक, लुटण्याचा प्रयत्न

Updated: जानेवारी 3, 2026

By Vivek Sindhu

मांजरसुंबा घाटात पिकअपवर दगडफेक, लुटण्याचा प्रयत्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

नेकनुर – धुळे-सोलापूर महामार्गावर वाटमारी करणार्‍या लुटारूंच्या मुसक्या बांधल्यानंतरही रात्री नेकनूर येथील संतोष काळे हे आपला पिकअप घेऊन जात असताना मांजरसुंबा घाटात अचानक त्यांच्या गाडीवर अंधाधूंद दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीने गाडीचालक गाडी थांबवतो आणि नंतर लुटारू लूट करतात, परंतु काळे यांनी गाडी थांबवली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, मात्र 112 वर कॉल केला.तो कॉल उचलला गेला नाही. रात्री तशी मदत संबंधिताला मिळाली नसल्याचे सांगण्यात येते.
2025 च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये धुळेसोलापूर महामार्गावरील येरमाळा ते गेवराई दरम्यान वाटमारीच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मध्यंतरी बीड पोलिसांनी मोठ्या कारवाया करत लुटमार करणार्‍यांची धरपकड केली होती. त्यामुळे या महामार्गावरील वाटमारी आता थांबली, असे वाटत असतानाच रात्री पुन्हा मांजरसुंबा घाटात गाडीवर दगडफेक करून लूटमार करण्याचा प्रयत्न अज्ञात लुटारूंनी केला. नेकनूर येथील संतोष काळे हे आपला पिकअप घेऊन गावाकडे निघाले असता मांजरसुंबा घाटात अचानक त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू झाली. त्यांनी प्रसंगावधान ओळखून घटनास्थळी उभा न राहता पुढे जाणे पसंत केले. तेथून त्यांनी 112 ला मदतीसाठी कॉल केला मात्र तो कॉल उचलला गेला नाही. सदरच्या घटनेने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महामार्ग पोलिसांची या रस्त्यावर गस्त वाढवावी, अशी मागणी आता होत आहे.


Categories

Recent Posts