Breaking
Updated: मे 13, 2026
केज मधील अतिक्रमणावर अखेर पडला हातोडा पण पक्के बांधकाम जैसे थे .......!
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- दि. १३ मे रोजी सकाळी ९:०० पासून केज शहरातील अतिक्रमणे हटविण्यात सुरुवात झाली. यावेळी स्वतः तहसीलदार, गटविकास अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, मुख्याधिकारी, एसटीचे अधिकारी, रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, विविध विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलिसांचा फौजफाटा यांच्या बंदोबस्तात केज शहर आणि सरकारी कार्यालये व महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्यात आली.
केज शहरातील महामार्ग, सरकारी कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी झालेले बेकायदेशीर अतिक्रमणे ही दि १३ मे रोजी सकाळी ९:०० वाजल्या पासून हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली. या वेळी तहसीलदार अशोक भंडारे, गटविकास विठ्ठल नागरगोजे, तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे, मुख्याधिकारी , पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी उपअभियंता ससाणे, धारूर आगरचे आगार प्रमुख चौरे आणि पोलिस व आर सी एफ यांचा फौजफाटा रस्त्यावर उतरून अतिक्रण हटविले. केज शहारातून जाणारे महामार्ग तसेच तहसील कार्यालय, पंचायत , कृषि अधिकारी कार्यालय तसेच मंगळवार पेठ येथील अतिक्रमणे येथील सुमारे २०० ते २५० अतिक्रमणे काढण्यात आली.
प्रचंड पोलीस बंदोबस्त :- अतिक्रमण हटाव मोहित केज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, युसुफवडगाव आणि धारूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह दंगल नियंत्रण पथक यांचा बंदोबस्त होता.
अनेकांचे संसार उघड्यावर :- या अतिक्रमण हटावमुळे टपरी चालक, हॉटेल, झर्रॉक्स, फळ विक्रेते, चहाच्या टपऱ्या, गॅरेज असा व्यवसाय करणारे यांचा संसार उघड्यावर आले आहेत.
काही अतिक्रमणे जैसे थे ! :- तहसील कार्यालय आणि कळंब चौक व कानडी चौकातील काही अतिक्रमणधारकांनी पक्के बांधकाम केले असल्याने त्यांचे बांधकामाला अधिकारी हात लावू शकले नसल्याने या भेदभावाची चर्चा सुरू आहे.
कृषी विभागाने हटविली त्यांच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणे :- बस स्टँड समोरून जाणाऱ्या अंबाजोगाई बीड महामार्गाच्या उत्तर दिशेला असलेल्या फलोत्पादन खात्याच्या जागेतील तालुका कृषी अधिकारी सागर पठाडे यांनी सर्व अतिक्रमणे हटविली आहेत.
काही अधिकाऱ्याची कचखाऊ भूमिका :- ज्या प्रमाणे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी फलोत्पादन खात्याच्या हद्दीतील सर्व अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला मात्र पशुसंवर्धन, तहसील, पंचायत समिती यांनी त्यांच्या हद्दीतील काही अतिक्रमणे आहे तशीच ठेवल्याने त्यांच्या कचखाऊ भूमिकेची चर्चा सुरू आहे.