Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

साळेगाव येथे ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी संपन्न

Updated: जानेवारी 5, 2026

By Vivek Sindhu

राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी संपन्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी केज तालुक्यातील साळेगाव येथे साजरी करण्यात आली.

जमिनी विका पण मुलांना शिकवा असा पुरोगामी आणि क्रांतिकारक विचारांचे ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साळेगाव तालुका केज येथे साजरी करण्यात आली. पुण्यतिथी निमित्त भगवान श्रीकृष्ण आश्रम मठाचे ह.भ.प. भागवत भूषण केशव महाराज शास्त्री यांचे किर्तन आयोजित केले होते. कीर्तनाच्या कार्यक्रमाची सांगता झाल्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील भाविक भक्तासह नागरिकांनी लाभ घेतला. पुण्यतिथीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वामन गिते, पांडुरंग गिते, बालाजी गिते, अक्षय गिते, श्रीअनंत  गिते, सुशेन गिते, दत्ता गिते, भागवत तिडके, आश्रुबा गिते यांनी परिश्रम घेतले. 


Categories

Recent Posts