Breaking
Updated: फेब्रुवारी 25, 2026
उपमुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांना दिले निवेदन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी)
कापूस खरेदी हंगाम २०२५-२०२६ मध्ये कापूस उत्पादीत शेतकऱ्यांचे कापसाला किमान आधारभुत किंमत (हमीभाव) योजनेत राज्यातील कापूस खरेदी अंतर्गत सी.सी.आयकडून कापूस खरेदीची अंतीम तारिख २७/०२/२०२६ देण्यात आलेली आहे. राज्यातील असंख्य कापूस उत्पादीत शेतकऱ्यांचा कापुस विक्रीसाठीचे सी.सी.आयचे अनेक तांत्रिक आणि नेटवर्कच्या कारणांमुळे खूप मोठा कापूस अद्याप ही विक्री करणे राहिलेला आहे. हंगाम सुरूवातीचे लांबलेल्या पावसामुळे कापूस हंगाम विस्कळीत झाला आहे. तसेच विक्रीसाठी सी.सी.आयकडे आणण्यासाठी शेतकऱ्यांनी कपास किसान ऍपवर नोंदणी करण्यासाठीची तारीख ३० डिसेंबर २०२५ ठेवली होती. असंख्य शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे ती पुढे १५ जानेवारी २०२६ पर्यंतच करणेत आली. आजही असंख्य शेतकरी हे नोंदणी अभावी सी.सी.आयकडे त्यांचा उत्पादीत कापूस विक्रीसाठी आणु शकत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कपास किसान ऍपवर नोंदणी करणेची मुदत ही यापुढे ३० एप्रील २०२६ पर्यंत करणेत यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी व संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी व संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी नमूद केले आहे की, सी.सी.आय कापूस खरेदी हमी भाव प्रति क्विटंल रू.८०००/- एवढा असून सध्या बाजारात कापूस खरेदी प्रति क्विंटल रूपये ७३०० ते ७५००/- एवढी चालु आहे. शेतकऱ्यांना सी.सी.आय कापूस विक्रीसाठी मुदत वाढवून ३० एप्तील २०२६ पर्यंत वाढवून दिली नाही तर बाजारातील कापसाचे भाव प्रति क्विंटल भाव ७०० रूपयांपर्यंत ही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सी.सी.आयकडे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सहकारमंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचेकडे निवेदन देवून सोमवार, दि. २३/०२/२०२६ रोजी आम्ही मागणी केलेली आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक व पणन महासंघाचे संचालक राजकिशोर मोदी व संचालक ऍड.विष्णुपंत सोळंके यांनी दिली आहे.