नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता आज (२ ऑगस्ट) पासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज वाराणसी येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करत असून त्याच कार्यक्रमात त्यांनी या योजनेचा हप्ता वितरित केला.
या योजनेअंतर्गत देशभरातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना प्रत्येकी २,००० रुपयांचा हप्ता मिळणार आहे. एकूण २०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “आज ‘किसान उत्सव दिवस’ साजरा होत असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून १.७५ लाख कोटी रुपयांचे खत अनुदानही देण्यात येत आहे.”
वार्षिक लाभ ६,००० रुपये
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये (२,००० रुपये प्रत्येकी) थेट बँक खात्यावर DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे दिली जाते. यापूर्वीचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात आला होता.
रक्कम जमा झाली का? अशी करा तपासणी
शेतकऱ्यांना आपला हप्ता जमा झाला आहे की नाही, हे घरी बसून ऑनलाइन तपासता येते. यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया करा: