Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बस प्रवासात वृद्ध महिलेचे दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास

Updated: फेब्रुवारी 11, 2026

By Vivek Sindhu

बस प्रवासात वृद्ध महिलेचे दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: लग्नासाठी माहेरी जाणाऱ्या एका वृद्ध महिलेला धावत्या बसमध्ये चोरट्यांनी लक्ष्य केले असून, प्रवासादरम्यान बॅगेतून सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. ही घटना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी नेवासा ते बीड प्रवासादरम्यान घडली. याप्रकरणी जयश्री दिलीप भागवत (वय ६४, रा. लोणी, ता. राहाता) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चकलांबा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जयश्री भागवत या त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी लातूरला निघाल्या होत्या. ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता त्या नेवासा येथून ‘नेवासा-अक्कलकोट’ बसमध्ये बसल्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीणही होती. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी सोन्याचे दागिने एका पिशवीत रुमालात बांधून कपड्यांच्या बॅगेत मधोमध ठेवले होते. मात्र, दुपारी २ वाजेच्या सुमारास बीड बसस्थानकात उतरल्यानंतर त्यांना बॅगेची चैन उघडी दिसली. तपासणी केली असता १० तोळे वजनाचे दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.

चोरट्यांनी लंपास केलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याची पोत, पेंडल, बांगड्या आणि मणीकंठी असा एकूण ५ लाख ४७ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल आहे. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने ही हातसफाई केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनंत तांगडे या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयितांची चौकशी सुरू आहे.


Categories

Recent Posts