Breaking

चोरीची अल्युमिनियम तार घेऊन जाणारा टेम्पो पकडला

Updated: एप्रिल 10, 2026

By Vivek Sindhu

चोरीची अल्युमिनियम तार घेऊन जाणारा टेम्पो पकडला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – विद्युत वितरण कंपनीची चोरलेली अॅल्युमिनियम तार विक्री करण्याच्या उध्देशाने बीड ते नेकनूर मार्गे केजकडे जाणारा आयशर टेम्पो पोलीसांनी पकडला.नांदुरफाट्याजवळ पोलीसांनी ही कारवाई करून ९ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळलेल्या गोपनिय माहितीच्या आधारे पथकाने नांद्रफाट्याजवळ संशयित टेम्पोची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये १५०० किलो वजनाचे अॅल्युमिनियम तारचे १२ बंडल आढळून आले. या कारवाईत पोलीसांनी टेम्पो चालक सुखदेव सुभाष गायके (वय ३१) रा. धारूर यास ताब्यात घेऊन ४ लाख ५० हजार रूपयांची अॅल्युमिनियम तार आणि टेम्पो असा एकूण ९ लाख ५० हजार रूपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस अधिक्षक नवनीत काँवत, अप्पर अधिक्षक चेतना तिड़के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी.श्रीराम खटावकर, पो.ह. अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, अशफाक सय्यद, मनोज परझणे, सिध्देश्वर मांजरे, विकास राठोड यांनी केली.


Categories

Recent Posts