Breaking

शिक्षण केंद्रप्रमुख ५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

Updated: सप्टेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

पंचायत समितीच्या आवारात दोन हजाराची लाच घेताना ग्रामसेवक लाचलुचपतच्या जाळ्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : तालुक्यातील धारवंटा येथील गोविंद सुखदेव शेळके (वय ५६), केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळगाव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना २० सप्टेंबर रोजी रंगेहात पकडले.

तक्रारदार यांनी कोळगाव (ता. गेवराई) येथील आर्थिक अनियमिततेसंबंधी चौकशी अहवाल व्यवस्थित पाठविण्यासाठी मदतीच्या बदल्यात शेळके यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी १८ सप्टेंबर रोजी बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोनि. राहुलकुमार भोळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केल्यानंतर शेळके यांनी तडजोडीअंती ५ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यानुसार २० सप्टेंबर रोजी तक्रारदार यांच्या घराजवळील कृषी कॉलनी येथे पंचासमक्ष लाच स्वीकारताना बीड एसीबी पथकाने शेळके यांना जेरबंद केले. पंचासमक्ष लाचेची रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलीस समाधान कवडे, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल राठोड, अविनाश गवळी, प्रदीप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, अंबादास पुरी व गणेश मेत्रे यांनी सहभाग घेतला.


Categories

Recent Posts