Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

Updated: नोव्हेंबर 28, 2025

By Vivek Sindhu

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साबला (ता. केज) येथे शुक्रवारी (दि. २८) दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास घडली.
साबला येथील रामेश्वर अशोक पांचाळ हा युवक केज येथील वसंत विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होता. शुक्रवारी दुपारी पावणे एक वाजेच्या सुमारास रामेश्वर पांचाळ याने राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच जमादार प्रल्हाद चव्हाण, पोलीस नाईक प्रकाश मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिला. ज्ञानेश्वर पांचाळ यांच्या खबरेवरून केज पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


Categories

Recent Posts