Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सिनेस्टाईलने पाठलाग करून केज पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करीत असलेली कार पकडली

Updated: फेब्रुवारी 13, 2026

By Vivek Sindhu

अंधाराचा फायदा घेत कारचालक झाला फरार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

९९ हजाराची दारू आणि कार असा अडीच लाखाचा मुद्देमाल ताब्यात , अंधाराचा फायदा घेत कारचालक झाला फरार

 गौतम बचुटे/केज :- केज येथे अवैधरीत्या चोरट्या दारूची वाहतूक करीत असलेली एका कारचा पाठलाग करून पोलिसांनी कारसह त्यातील दारू ताब्यात घेतली. मात्र त्याची वेळी अंधाराचा फायदा घेत दारूची वाहतूक करणारा कारचा चालक कार सोडून पळून गेला.

या बाबतची माहिती अशी की, दि. १२ फेब्रुवारी रोजी केज पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे आणि पोलिस नाईक शिवाजी कागदे हे एका खाजगी वाहनाने रात्र गस्त घालीत असताना त्यांना सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी माहिती दिलीं, की केज कळंब रोडवर एक पांढऱ्या रंगाची ऑल्टो कार क्र. (एम एच -३१/डी सी- ४२१९) ही संशयास्पदरित्या धावत असून त्या कारमधून अवैध्यरित्या चोरट्या दारूची वाहतूक होत आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे आणि पोलिस नाईक शिवाजी कागदे हे सतर्क झाले. त्यांनी हॉटेल संतोष पॅलेस समोर सापळा लावून सदर कार अडविण्याचे प्लॅन केला. परंतु त्या कार चालकाच्या लक्षात, पोलिसांचा प्लॅन आल्या नंतर तो पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी केन येत कळंब चौकातील छत्रपती शिवाजी महाराज चौका पर्यंत त्याचा पाठलाग केला. त्यावेळी कार चालकाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पासून कार बीडच्या दिशेने वळवून भरधाव वेगाने बीडच्या दिशेने जावू लागला. पोलिस पथकाने त्याला पोलीस ठाण्याच्या गेट समोर पोलिसांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पोलिसांना न जुमानता कार पुढे घेऊन गेला. त्या नंतर पोलिस पाठलाग करीत असताना कार चालकाने केज येथील महात्मा फुले नगरच्या अरुंद गल्लीत कार घातली आणि कार सोडून पळून गेला. त्या नंतर पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे,पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इ ईनामदार, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे आणि पोलिस नाईक शिवाजी कागदे यांनी पंचा समक्ष कारची झडती घेतली असता कारमध्ये ॲड्रिल क्लासिक व्हिस्की असे नाव लिहिलेले ११ बॉक्स त्याच्या मध्ये १३२ बॉटल्स होत्या प्रत्येक बॉटलीची किंमत ७५० रु. प्रमाणे त्याची एकूण ९९ हजार रु किंमतीचा मुद्देमाल माल आणि इतर सहित्य आढळून आले. 

त्या नंतर पोलीस उपनिरीक्षक अमिरोद्दीन इनामदार यांच्या फिर्यादी वरून अज्ञात कार चालका विरुद्ध गु. र. नं. ६८/२०२६ महाराष्ट्र दारू बंदी अधिनियमचे कलम ६५(ए), ६५(ई), ६६(१) (बी), ८१, ८३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे हे करीत आहेत.

कारमध्ये आढळून आलेल्या दारूच्या बायकां बूचाचा उद्देश काय ? :- पोलिसांनी चोरट्या दारूसह ताब्यात घेतलेल्या त्या कार मध्ये एका पोत्यात दारूच्या बॉटलला लावण्यासाठी वापरण्यात येणारे बूच आढळून आले. त्यामुळे या चोरट्या दारूची विक्री करीत असलेला इसम आणि त्याचे साथीदार ही बनावट दारू निर्मिती करून ती विक्री करीत असावेत असा अंदाज आहे.

उत्पादन शुल्क विभाग झोपेचे सोंग घेत आहे !:- जिल्ह्यात अनेक धाबे आणि हॉटेल्सवर खुलेआम बनावट दारू विकली जात असताना उत्पादन शुल्क विभाग मात्र झोपेचे सोंग घेऊन.गप्प एक आहे. तसेच मागील काही महिन्या पूर्वी उत्पादन शुल्क विभागाने केज मध्ये काही लुटुपुच्या कारवाया केल्या मात्र त्याची माहिती माध्यमांना दिली नसून संबंधित विभागाचे अधिकारी मात्र माध्यमांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असतात.


Categories

Recent Posts