Breaking
Updated: मार्च 16, 2026
६ लाख ६८ हजारांच्या गुटक्यासह स्विफ्ट कार जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने बीड शहरात मोठी कारवाई केली आहे. फुलाईनगर भागात बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट कारवर छापा टाकून पोलिसांनी ६ लाख ६८ हजार १८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून मुख्य पुरवठादार फरार झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेडवाड यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, फुलाईनगर परिसरातून स्विफ्ट कार क्रमांक MH-43/R-5725 मधून प्रतिबंधित गुटख्याची विक्रीसाठी वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे आज १६ मार्च २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत स्विफ्ट कारमध्ये भाऊसाहेब राम पडुळे (वय ३४, रा. औरंगपूर, ता. जि. बीड, ह.मु. स्वर्णनगरी, फुलाईनगर, बीड) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित गुटख्याची विक्री करण्यासाठी वाहतूक करताना रंगेहात मिळून आला. पोलिसांनी विविध कंपन्यांचा गुटखा आणि कार असा एकूण ६ लाख ६८ हजार १८४ रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत हा गुटखा रेवन्नाथ चादर (रा. भाटसांगवी, ता. जि. बीड) याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्या रेवन्नाथ चादर हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या दोन्ही आरोपींविरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या गुन्ह्यात अन्य कोणा आरोपीचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास बीड शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, राहुल शिंदे, युनुस बागवान, स्वाती मुंडे, अशपाक सय्यद, मनोज परजणे आणि चालक नितीन वडमारे यांच्या पथकाने केली आहे.