Breaking
Updated: फेब्रुवारी 10, 2026
स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्णांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करणार-डॉ.ओमप्रकाश शेटे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय हे आशिया खंडातील एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे व आपण या जिल्ह्यातील रहिवाशी असल्यामुळे या रुग्णालयास अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आपला मानस असल्याचे आयुष्यमान भारत मशिन समिती महाराष्ट्र राज्य चे डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आज सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष मा.नंदकिशोर मुंदडा, प्रभारी अधिष्ठाता डॉ.बगाटे व इतर विभागातील सर्व डॉक्टर उपस्थित होते.
डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी रुग्णालया बद्दल सविस्तर माहिती देताना सांगितले की, माननीय देवेंद्रजींनी या माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याला राजाश्रय दिला, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख केलं. आज, माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची महत्वाकांक्षी योजना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, ही महत्वाकांक्षा यासाठी म्हणतोय. गेल्या टर्ममध्ये, २०१४ ते १९, मी त्यांचा ओएसडी होतो, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो. या काळामध्ये, त्यांनी दोन पायलट प्रोजेक्ट राबवले होते: एक जनयुक्त शिवार आणि दुसरा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष. मी भाग्यवान आहे की, त्या मुख्यमंत्री सहायता कक्षाचा मी पहिला प्रमुख होतो. आज, या टर्ममध्ये, माननीय मुख्यमंत्री महोदयांचे दोन पायलट प्रोजेक्ट आहेत: एक सोलर हा त्यांचा पहिला प्रोजेक्ट आहे. सोलरचे पंप असू देत किंवा सोलरचे युनिट असू देत, पूर्ण याच्यामध्ये जे पावर जनरेशन करता येतील. आणि दुसरा पायलट प्रोजेक्ट आहे, हा आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समिती आणि या समितीचा मला पहिला अध्यक्ष केलं. मी काम करायलाच पाहिजे, जिल्ह्यामध्ये, एक नैसर्गिक बाब आहे, माझ्यावरती सातत्याने तिथंही आरोप होतात, की आपण बीडच्या लोकांना थोडं जास्त कशा पद्धतीने हे करता येतं. तर बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त चांगले हे व्हायला पाहिजेत. या ठिकाणी एसआरटी मेडिकल कॉलेजमध्ये, मला थोडंसं वाईट वाटलं, की आशिया खंडामध्ये नंबर एक ची असलेली ही, याकडे माझं स्वतःचं दुर्लक्ष झालं, त्यामुळं नाही. त्याचं कौतुक करायला इथे आलो मी, एलिगेशन (आरोप) करायला आलो नाही. ५००, ५५० बेड संख्या असती, परंतु दररोज ७००, ८०० ऍडमिशन (प्रवेश) होतात. सोपी बाब असते की, आपण त्याच्यावरती टीका-टिप्पणी करणं, या ठिकाणी रिक्रुटमेंटचा फार मोठा विषय, पोस्टिंग खूप व्हॅकट (रिक्त) आहेत. मला वाटतं, या ठिकाणी ३७१ पोस्ट व्हॅकट आहेत. या परिस्थितीमध्ये काम करत असताना, जो क्रायटेरिया ५० यूजीच्या सीटला, तोच आज १५० सीट आज यूजी च्या म्हणजे मी बीएच च्या झाल्यात. तेच मनुष्यबळ घेऊन हे करतायेत. आज या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतला. या ठिकाणी दोन-तीन प्रामुख्याने माझ्या डीन साहेबांना सूचना होत्या की, आपण काही गोष्टी ज्या आपल्या हातात आहेत, त्या ताबडतोब करायला पाहिजेत. कार्डियाकचं युनिट याठिकाणी नाहीये, हे वाईट वाटलं. शासकीय यंत्रणेमध्ये अनेक ठिकाणी आउटसोर्स करण्यात आलेत. आपण त्यांना पीपीटी मॉडेलवरती चालवायला द्यायला पाहिजे. लोकांना आरोग्य सुविधा कशा मिळतायेत, याच्याशी महत्व असलं पाहिजे. कुणी अशा पद्धतीचा कुठला प्रस्ताव मागावा, दोन-पाच त्याचं निगोसिएशन करा आणि कारण इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे आपल्याकडं. यात लॅब टाकेल. इथं लोकांचे मोफत ऑपरेशन होतील. पैसा महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान एकत्रित आयुष्मान याच्यातून आम्ही देऊ. त्यामुळं लोकांचे मोफत उपचार होतील, त्यातला काही रेवेन्यू त्यांना जाईल, काही रेवेन्यू तुम्हाला येईल.
त्यामुळे जास्त गोष्टीची वाट न बघता ताबडतोब ह्यामध्ये आऊटपुट दिला पाहिजे. ह्या मताशी आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधींसह सगळेजण, याच्यामध्ये आम्ही मान्यता दिली की, ह्याच्यामध्ये आपण पुढे जाऊयात. यानंतर ग्रामीण भागामध्ये दुसरा प्रश्न आहे. गुडघे बदल म्हणजे सांधे बदल, आणि गुडघे बदल टी. के. आर. आणि पी. एच. आर. ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तर या ठिकाणी रिप्लेसमेंट होते. पण टी. के. आर. मध्ये त्यांना काही अडचणी आहेत, त्यामुळे मी ठरवलं, आयुष्मान भारत योजनेचा अध्यक्ष म्हणून, जिल्ह्यातले बहुतांश (मला वाटतंय सिव्हिल हॉस्पिटलला पण होत नाही टी. के. आर. वगैरे नाही.) त्यामुळे ह्या ठिकाणी होतात, परंतु ह्या ठिकाणी प्रॅक्टिकली होत नाही. नाराज होण्यापेक्षा त्यात मार्ग काढण्याचा मी मार्ग स्वीकारला आहे. आणि हे इम्प्लान्ट आहेत. हे गुडघे बदलाचे कारण, बहुतांश लोकांच्या घरी असे पेशंट आहेत. खूप लोकांना मी ब्रिज कँडी पासून, लीलावती पासून, एस. एम. बी. टी. भारतीय हॉस्पिटल, वाय. सी. एम., डी. वाय. पाटील या ठिकाणी करतो. पण आपल्या इथला पेशंट मुंबईला एम जे एम मध्ये हमखास दर आठवड्यामध्ये असतात. संचितांना दर महिन्यामध्ये १० पेशंट माझे करतात. पण संख्या एवढी आहे की, ती आपलं असलेलं हॉस्पिटल आपण या ठिकाणी युटिलायझेशन करायला पाहिजे. त्यामुळे मी निर्णय घेतला की, सी. एस. आर. मधून मी या ठिकाणी मोफत इम्प्लान्ट पाठवतो, आणि आपण या ठिकाणचा १००% एक छोटासा कार्यक्रम घ्यायचा आहे या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले मध्ये जिल्ह्यातला १/२ लोड या ठिकाणी आयुष्मानचे ४९% कार्ड जिल्ह्याने काढलेत. २३ लाख ४६ हजार अशी आकडेवारी आहे. ११,५२,००० कार्ड या ठिकाणी काढलेत. हा राज्यातला सगळ्यात चांगला आकडा आहे. ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय किडनी तर आहेच आमचं. ४ १/२ फुफ्फुस, यकृत म्हणजे लिव्हर या सगळ्या ट्रान्सप्लांटला सरकारने २२ लाखांपर्यंतच बजेट आमच्या कडे दिले. त्याची जबाबदारी आमच्याकडे दिली म्हणून २२ लाखांपर्यंत उपचारासाठी तरतूद आयुष्यमानमध्ये केली. महाराष्ट्र हे असं पहिलं राज्य आहे की, जिथे नऊ ट्रान्सप्लांट्स हे व्हिजी आहेत, त्यांना परवानगी देणारं आणि खूप चांगलं पॅकेज देणारं. त्यामुळे मला वाटतंय, येत्या काळामध्ये जास्तीत जास्त लाभ आपल्या भागातल्या लोकांना या ठिकाणी दर्जेदार उपचार मिळावे, यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बेस कसा वाढवता येईल? पायाभूत सुविधांचा जो अंतर्भाव आहे, यामध्ये खूप शॉर्ट फॉल आहे, तो सगळा कसा पूर्ण करायचा? आकडेवारी प्रचंड ड्रॉबॅक आहे, हे आम्हाला मान्य आहे. ६६३९ पेशंटला आमच्या योजनेतून तुम्ही लाभ दिलाय, म्हणजे मला आश्चर्य वाटतं, २०१९ पासून तुम्ही ३९००० पेशंटला इथं ट्रीटमेंट दिली आहे. सोपं नाहीये आज आतापर्यंत आणि भरपूर फंडिंग आमच्या योजनेमार्फत यांना जाते. स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाला ५० वर्ष झाली आहेत आणि स्वामी रामानंद तीर्थांच्या लढाईला ७५ वर्ष झाली आहेत. माननीय लोकप्रतिनिधी आमदार महोदयांचे ते प्रतिनिधी म्हणून आणि स्वतः नगराध्यक्ष म्हणून एक चांगलं झालं, सगळं एकाच ठिकाणी आल्या नंतर आपले वैचारिक स्थान आणि सत्ता आहे, त्याचा सत्तेचा फायदा घेण्यासाठी आम्ही एकत्रित असा प्रयत्न करतोय, की ज्या पद्धतीने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर पूर्ण देशामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले, त्याद्वारे वेगवेगळे फंडिंग हे करता आले. काही ठिकाणचे शहीद स्मारक असूदेत किंवा काही ठिकाणच्या इन्फ्रास्ट्रक्चर बेसला आपण खूप चांगल्या पद्धतीने गती दिली, तशी स्वामी रामानंत तीर्थांना खरी आदरांजली वाहण्यासाठी आपण एक सर्वसमावेशक असा प्रस्ताव एकत्रित बसून या शहराचा, कारण हे सत्ता केंद्र होतं, हे क्रांतीचं केंद्र होतं. हा आमचा प्रयत्न असेल, की स्वामी रामानंद तीर्थ मेडिकल कॉलेजला ५० वर्ष झाली आहेत, आणि त्या चळवळीला ७५ वर्ष झाली आहेत, याचा संयुक्तिक विद्यमाने एकत्रित कार्यक्रम हे करून या ठिकाणचे जे ड्रॉबॅक आहेत, तो पूर्णला पूर्ण भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी ५१८ बेड असताना, ७०० पेक्षा जास्त पेशंट, १२०० पेक्षा जास्त ओपीडी फार मोठ्या गोष्टी आहेत. आज इएनटी सर्जन इथे आहेत, त्यांना सांगितलं की कॉकलेट इम्प्लांट इथून पुढं सुरू करा, आमच्या ह्याच्यामध्ये पॅकेज आहेत, त्यांनी तत्वतः मान्य केले. या ठिकाणी स्पीच थेरपीचं सेंटर आहे. जे कर्णबधिर मुलं असतात, त्यांना इथं उपचार व्हावेत यासाठी आमच्या महात्मा फुलेमध्ये आणि आयुष्यमानमध्ये पॅकेज आहे, त्याचा वापर करण्याची निर्देश आजच्या बैठकीच्या माध्यमातून दिलेत. त्यामुळे येत्या काळामध्ये जेवढ्या काही चांगल्या गोष्टी करता येतील, तेवढा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा हा प्रयत्न केला आहे. स्वर्गीय विमल ताई मुंदडांच आमची आठवण आली, त्याचं कारण आहे, की त्यांना दुर्दैवाने कॅन्सरला बळी पडल्या, त्या आरोग्यमंत्री असताना, परंतु या ठिकाणी कोबाल्ट युनिट त्यांनी त्यावेळेस सुरु केलं होतं, त्याच अद्ययावत म्हणून आता नवीन जे कॅन्सरचे एक विशिष्ट केंद्राची योजना आहे, ट्रिपल सी म्हणतात त्याला आणि ती योजना ४५ कोटी रुपये पर्यंत योजना आणायची आणि त्याला कॅबिनेटची मान्यता लागते, केंद्र आणि सरकारचं १०० पैकी एक तर २५% विवेकानंदाला आपण २५% राज्याने दिलंय आणि ७५% केंद्राने दिलंय. ४०-६० चा असा रेशिओ असतो, तर आम्ही इथे पाहू, प्रस्ताव सादर करण्यासाठी सांगितले. असेही ओमप्रकाश शेटे यांनी सांगितले.