Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

केजच्या बस स्टँडवर महिलेच्या पर्स मधील दागिने चोरी प्रकरणी गंगाखेड येथून एक महिलेला घेतले स्थागुशाने ताब्यात

Updated: फेब्रुवारी 9, 2026

By Vivek Sindhu

संशयित महिलेस तीन दिवसांची पोलिस कोठडी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

संशयित महिलेस तीन दिवसांची पोलिस कोठडी 

गौतम बचुटे/केज :- भावाच्या लग्नाच्या निमित्ताने माहेरी जात असलेल्या एका विवाहित महिलेच्या पर्स मधून केज च्या बस स्टँडवर ३ लाख ३५ हजार रु. चे सोन्याचे दागिने चोरीला गेलेल्या घटनेतील स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे.. 

दि. १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:४५ वाजण्याचे सुमारास केज येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहत असलेल्या अश्विनी गोविंद घोळवे या त्यांच्या भावाच्या लग्नाच्या कार्यक्रमा निमित्त लातूर येथे त्यांच्या माहेरी जात असताना त्या नाशिक-लातूर या बस मध्ये चढत असताना त्यांच्या पर्सची चैन उघडून पर्स मध्ये ठेवलेले १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोठे पट्टीचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, असे एकूण ३ लाख ३५ हजार ९८० रु. किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होते.

दरम्यान अश्विनी घोळवे यांनी दिलेल्या माहिती वरून दि. ७ फेब्रुवारी रोजी पोलीस अधीक्षक नवनीत  काँवत,  अप्पर पोलिस अध्यक्ष सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार दिलीप गिते, पोलीस हवालदार , पोलिस हवालदार भागवत शेलार, महिला पोलीस हवालदार स्वाती मुंढे, पोलिस हवालदार मराडे यांच्या पोलिस पथकाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातून एका संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी अश्विनी घोळवे यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ५१/२०२६ भा. न्या. सं. ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे तपास करीत आहेत.

___________________________________________

संशयित महिलेस तीन दिवसांची पोलिस कोठडी :- संशयित महिलेस तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण किर्तने यांनी न्यायालया समोर हजर केले केले असता संशयित महिलेस ११ फेब्रुवारी पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान केज येथील अशा प्रकारच्या चोरीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून पोलिस तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts