Breaking
Updated: फेब्रुवारी 26, 2026
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : अजित पवार यांच्या जाण्याने नुकसान झालं. अजित पवारांमुळे (Ajit pawar) राज्यात आणि देशात आपली ओळख निर्माण झाली होती, सामान्य कुटुंबातून ते आले होते. 2023 मध्ये अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष झाले, हे सांगण्यात मला कोणतीही अडचण नाही, असे म्हणत राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवारच (Sunetra Pawar) राष्ट्रीय अध्यक्ष असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. पटेल यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याबाबतचा प्रस्ताव मांडला, त्याच सर्वानुमते सहमती दर्शवण्यात आली. दरम्यान, पार्थ पवार यांच्याकडेही मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अजित दादा 28 जानेवारी दिवशी आपल्यातून निघून गेले, आपल्या सर्वांसाठी ते धक्कादायक होतं. आपल्या सर्वाना प्रश्न होता उद्या आपण काय करणार, कसं करणार? पण सुनेत्राताईंच्या नेतृत्वात आपला पक्ष काम करेल, असे प्रफुल पटेल यांनी म्हटले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार, रुपाली चाकणकर छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
मागच्या महिन्यात आपण पाहिलं की, काहींजण बोलू लागले. आपल्या पक्षात काही संबंध नाही ते काहीही बोलायला लागले, आम्ही काय करायचं ते सांगायला लागले. पोटात एक आणि ओठात एक बोलू लागले. परंतु आपण सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं. आपण योग्यवेळी योग्य निर्णय केला. आता, आपल्याला अजित पवारांच्या आदर्शावर पुढे जायचं आहे. आता आपण नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वात आपली वाटचाल करणार आहोत. आपण सर्वजण याठिकाणी एकत्र आलो आहोत. सगळ्या प्रांतातील लोकं याठिकाणी आले आहेत, असे म्हणत प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा केली.
अजित पवारांनी मला राष्ट्रीय कार्याध्यक्ष केलं होतं. त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास टाकला होता. पक्ष महाराष्ट्र आणि देशाच्या हितासाठी आम्ही काम केलं. राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून माझी आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून तटकरे आणि भुजबळ मुश्रीफ आमची सर्वांची जबाबदारी होती आपला पक्ष आपण कशा प्रकारे पुढे घेऊन जाणार आहोत. मी 35 वर्ष अजित पवारांचा मित्र म्हणून आज घोषणा करत आहे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष केल जावं, असा प्रस्ताव प्रफुल पटेल यांनी मांडला. त्यानंतर, सर्वांनी हात उंचावत सहमती दर्शवली. तसेच, मी घोषणा करतोय की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे, असे पटेल यांनी जाहीर केले.
अजित पवारांची आठवण
अजित पवार एका वेगळ्या मातीचेच बनले होते, आपल्यावर अनेक संकटे आली. अजित पवारांनी नेतृत्व हातात घेतल्यानंतर एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली आपल्याला प्रश्न पडला होता आता आपण पुढे कसं जाणार आहोत. मात्र, अजित पवारांनी कधीही आपला निश्चय कमी होऊ दिला नाही. शेवटी नेता तोच असतो जो लढाईमध्ये पुढे येऊन लढाई लढतो आणि त्यानुसार त्यांनी लढाई लढली, जिंकली. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे यांना माहिती आहे की, अजित पवारांबाबत काय भावना होती आणि आता नाहीत त्यावेळी काय आहे. सुनेत्रा पवार ज्यावेळी उपमुख्यमंत्री झाल्या त्यावेळी आम्ही संसदेत गेलो त्यावेळी सगळेजण येऊन भेटत होते, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, अशी आठवण प्रफुल पटेल यांनी सांगितली.