Breaking

केज मतदार संघातील दोन रस्त्यांच्या सुधारणेसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद

Updated: मार्च 7, 2026

By Vivek Sindhu

आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आमदार नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

अंबाजोगाई: केज मतदार संघातील दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय नियोजनात केज आणि अंबाजोगाई तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते कामांसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

प्रस्तावित कामांनुसार धारूर, तांदळवाडी, उंदरी, कळब, अंबा आणि होळ या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील ९.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येणार आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता सुधारण्यासाठी प्रदीर्घ काळापासून मागणी होत होती. त्याचप्रमाणे, अंबाजोगाई तालुक्यातील नागापूर, साकूड ते अंबाजोगाई या दरम्यानच्या १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचेही रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

आमदार नमिता मुंदडा यांनी या कामांसाठी संबंधित विभागांकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. या दोन्ही कामांची एकूण लांबी २४.५० किलोमीटर असून, राज्य महामार्ग आणि मुख्य जिल्हा मार्ग अंतर्गत ही विकासकामे पूर्ण केली जाणार आहेत. या रस्ते सुधारणेमुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुलभ होणार असून स्थानिक व्यापार आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री पंकजाताई मुंडे यांचे आमदार नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.


Categories

Recent Posts