Breaking
Updated: मार्च 7, 2026
शाळेचे गेट पडल्याने विद्यार्थी जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – शहरातील बार्शी नाका परिसरातील जिल्हा परिषद शाळेत लोखंडी गेट पडल्यामुळे एक विद्यार्थी जखमी झाला आहे. विद्यार्थ्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बीड शहरातील अशोक नगर जिल्हा परिषद शाळेतील अर्शलान बागवान हा विद्यार्थी गेट उघडण्यासाठी धावत गेला असता गेट अचानक खाली पडले. या दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला.या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी विद्यार्थ्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.गेटची अवस्था जीर्ण असतानाही त्याची दुरुस्ती किंवा सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या जीवावर बेतण्याची वेळ आल्याची संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली आहे.