Breaking

जालना रोडवर विद्यार्थ्याला दगडाने मारहाण; तीन जणांविरुद्ध गुन्हा

Updated: ऑगस्ट 26, 2025

By Vivek Sindhu

जालना रोडवर विद्यार्थ्याला दगडाने मारहाण; तीन जणांविरुद्ध गुन्हा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जालना रोडवरील सॅफरॉन हॉटेलसमोर विद्यार्थ्याला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

अदित्य कॉलेजला बी.टेक प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या वरद उर्फ लक्की गजानन साळुंके (वय 18, रा. कबाड गल्ली, बीड) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, 24 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता सॅफरॉन हॉटेलच्या बाहेर त्यांचा मित्र करण कदम यांच्यासह उभे असताना आरोपी प्रेम चांदणे याने दगडाने त्यांच्या डोक्यात मारून जखमी केले.

यानंतर करण कदम हे भांडण सोडवण्यासाठी पुढे आल्यावर प्रेम चांदणे याने त्यांच्यावरही दगड फेकून त्यांच्या डोळ्याजवळ दुखापत केली. त्यानंतर आरोपी प्रेम चांदणे, शुभम चांदणे आणि प्रेम गुरव (रा. पुरग्रस्त कॉलनी, खंडेश्वर उतार, बीड) या तिघांनी मिळून फिर्यादी व त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोह राऊत करीत आहेत.


Categories

Recent Posts