Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात संतुलन या विषयावर उद्योजकांसाठी विशेष आध्यात्मिक कार्यक्रम

Updated: फेब्रुवारी 18, 2026

By Vivek Sindhu

विषयावर उद्योजकांसाठी विशेष आध्यात्मिक कार्यक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

व्यापार आणि उद्योग विभाग (आरईआरएफ) आणि ब्रह्माकुमारीज, अंबाजोगाई यांच्याकडून आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी) – येथील व्यापार आणि उद्योग विभाग (आरईआरएफ) आणि ब्रह्माकुमारीज, अंबाजोगाई यांच्याकडून व्यवसाय आणि वैयक्तिक जीवनात संतुलन या विषयावर उद्योजकांसाठी विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.

उद्योजकांसाठी कार्य जीवन संतुलन या संदर्भाने तणाव हटवा, व्यापार वाढवा हे ब्रीद घेऊन व्यापार आणि उद्योग विभाग (आरईआरएफ) आणि ब्रह्माकुमारीज, अंबाजोगाई यांच्या वतीने शनिवार, दिनांक २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ब्रम्हाकुमारीज, आनंद सरोवर, वाघाळा रोड, अंबाजोगाई या ठिकाणी उद्योजकांसाठी विशेष आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते बी.के.राजयोगिनी ब्रह्माकुमारी गीता दीदीजी (अनुभवी स्पीकर आणि मुख्यालय-संयोजक, व्यापार आणि उद्योग विभाग, माऊंट आबू, तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ) उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरूषोत्तम भन्साळी, राजयोगी ब्रह्माकुमार राजसिंग भाई, (प्रेरक वक्ता, माऊंट आबू), राजयोगिनी ब्रह्माकुमारी हेतल दीदी (संचालिका, हिंडोन सिटी, राजस्थान) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निमंत्रक ब्रह्माकुमारी सुनिता दीदी (केंद्र संचालिका, ब्रह्माकुमारीज सेंटर, अंबाजोगाई) यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत सांगितले की, या कार्यक्रमातून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय आणि व्यवसाय आणि उद्योग विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा कार्यक्रम तुम्हाला एका प्रेरणादायी कार्यक्रमासाठी आमंत्रित करतो जिथे तुम्ही मनःशांती, सकारात्मकता आणि उच्च निर्णय क्षमतेने तुमच्या व्यवसायाला नवीन दिशा देऊ शकता असे निमंत्रक ब्रह्माकुमारी सुनिता दीदी यांनी सांगितले.

२४ फेब्रुवारी रोजी पारिवारिक स्नेहमिलन :
कुटुंब एकतेचा पाया, प्रेम आणि विश्वास या विषयावर प्रमुख वक्ते बी.के.राजयोगिनी ब्रह्माकुमारी गीता दीदीजी (अनुभवी स्पीकर आणि मुख्यालय-संयोजक, व्यापार आणि उद्योग विभाग, माऊंट आबू, तणाव व्यवस्थापन आणि व्यक्तिमत्व विकास तज्ज्ञ) उपस्थितांना मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात नंदकिशोर काकाजी मुंदडा (नगराध्यक्ष, अंबाजोगाई) यांच्यासह नवनिर्वाचित ३४ नगरसेवक यांचा ही सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मंगळवार, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ब्रम्हाकुमारीज, आनंद सरोवर, वाघाळा रोड, अंबाजोगाई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही कार्यक्रमात अंबाजोगाई शहर व परिसरातील बंधू व भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन निमंत्रक ब्रह्माकुमारी सुनिता दीदी (केंद्र संचालिका, ब्रह्माकुमारीज सेंटर, अंबाजोगाई) यांनी केले आहे.


Categories

Recent Posts