Breaking

ब्रह्मकुमारीज सेवा केंद्रात महिलांचा सन्मान व सशक्तीकरणाचा प्रेरक संकल्प

Updated: मार्च 10, 2026

By Vivek Sindhu

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

अंबाजोगाई (प्रतिनिधी)- येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज सेवा केंद्र – अंबाजोगाई येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिलांचा सन्मान व सशक्तीकरणाच्या प्रेरक संकल्पावर वाटचाल करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती राजयोगिनी ब्र.कु.सुनीता दिदी (संचालिका, अंबाजोगाई सेवा केंद्र, आनंद सरोवर) यांनी दिली आहे.

दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी प्रजापिता ब्रह्मकुमारीज सेवा केंद्र, आनंद सरोवर, वाघाळा रोड, अंबाजोगाई येथे नुकतेच शनिवार, दिनांक ७ मार्च २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.‌ या कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शिका आ.राजयोगिनी ब्र.कु.सुनीता दिदी या होत्या. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती आश्विनी जिरंगे (अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई.) या होत्या, तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मिसेस महाराष्ट्र डॉ.सुनीता तोंडगे (मिसेस महाराष्ट्र-२०२५ किताबाच्या मानकरी), शिक्षणतज्ज्ञ सौ.स्वरूपा कुलकर्णी (अध्यक्ष, स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर), ब्युटीशियन सौ.स्मिता हिरळकर (संचालक, साक्षी ब्युटी पार्लर), उद्योजिका सौ.अलका देशपांडे (कलांगण, वस्त्रकला) आणि विधिज्ञ ऍड.एम.बी.धायगुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यामध्ये महिला सशक्तीकरणा सोबतच स्वावलंबन, आत्मनिर्भर, आत्मसन्मान याचे महत्व स्पष्ट करून महिलांची जनजागृती करण्यात आली. वंदेमातरम – स्वर्णिम भारताचे हे अभियान गतीने पुढे नेण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारीज यांचे योगदान मोलाचे ठरत आहे. या योगदानात आध्यत्मिक आणि नैतिक मूल्यांची जपणूक करीत एक सुवर्ण राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा व शक्ती स्त्रीयां मध्ये आहे असे महत्त्वपूर्ण विचार बी.के.सुनीता दीदी यांनी व्यक्त केले. तर स्त्रीयांचा सन्मान हा फक्त महिला दिनी नसून तो प्रत्येक क्षणी व्हावा अशी अपेक्षा कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती आश्विनी जिरंगे (अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई.) यांनी व्यक्त केली. यावेळी प्रमुख अतिथी यांचेकडून ही स्त्रीचे समाजजीवनातील महत्व, कार्य व योगदान याबाबत मौलिक असे विचार व्यक्त करण्यात आले. ओम शांती या शांती मंत्राने या महिला गौरव दिनाची सांगता करण्यात आली. प्रजापिता ब्रह्मकुमारीज सेवा केंद्र अंबाजोगाई येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अंबाजोगाई शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.‌ या कार्यक्रमात नृत्य आविष्कार सादर केला, मेडिटेशन आणि समायोचित मार्गदर्शन लाभले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. तर सेवा केंद्राच्या वतीने मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार बी.के.मंजू दीदी यांनी मानले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात २०० हून अधिक महिला, युवती, भगिनी सहभागी झाल्या होत्या.

सोबत – बातमीचा फोटो.


Categories

Recent Posts